असं कोणतं फळ जे ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही? अन्यथा दंड भरावा लागेल, अनेकांना माहिती नसेल

जर तुम्ही नियमितपणे ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की फळे वाहून नेण्यासाठी देखील एक वेगळा नियम आहे. आणि जर नियम मोडला तर काय शिक्षा होऊ शकते हे देखील अनेकांना माहित नसेल. ते कोणते फळ आहे माहित आहे का?

असं कोणतं फळ जे ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही? अन्यथा दंड भरावा लागेल, अनेकांना माहिती नसेल
Indian Railways has banned the transportation of dried coconuts
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 27, 2025 | 11:57 PM

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी काही नियमांचे पालन करते. तुम्हाला ते नियम पाळावे लागतील. जो कोणी हे करत नाही त्याला पुन्हा शिक्षा होते. रेल्वेच्या नियमांनुसार, काही गोष्टी तुम्ही करू शकत नाही, जसे की काही गोष्टींवर बंदी. जसं की गॅस सिलेंडर. रेल्वेनुसार, ट्रेनमध्ये स्टोव्ह, गॅस सिलिंडर, फटाके, तेल, सिगारेट आणि स्फोटक वस्तू नेण्यास मनाई आहे. गॅस सिलिंडर वाहून नेण्यास मनाई आहे.

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी अनेक नियम बनवले आहेत

पण बऱ्याच जणांना हे माहित नसले की एक फळं असंही आहे जे ट्रेन प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी देखील एक वेगळा नियम आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना सुविधा पुरवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा परिस्थितीत, भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी अनेक नियम बनवले आहेत. प्रत्येक प्रवाशाने रेल्वेच्या या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

रेल्वेने  प्रवास करताना हे फळ तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही 

बऱ्याच जणांना हे माहित नाही की ट्रेनमध्ये फळांबाबत एक नियम आहे, जो प्रत्येक प्रवाशाने पाळला पाहिजे. ते म्हणजे प्रवासी ट्रेनमध्ये सुके नारळ घेऊन जाण्यास मनाई आहे . सुके नारळ वगळता सर्व फळे तुम्ही घेऊन जाऊ शकतात. सुक्या नारळाचा बाहेरील भाग ज्वलनशील मानला जातो. या भागामुळे आगीचा धोका वाढतो. म्हणून, हे फळ ट्रेनमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे.

नियम मोडल्यास दंड भरावा लागेल 

भारतीय रेल्वेच्या नियमात असे म्हटले आहे की, “जर एखादा प्रवासी ट्रेनमध्ये प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करताना आढळला तर रेल्वे त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकते. अशा परिस्थितीत, प्रवाशाला 1000 रुपये दंड, तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर प्रतिबंधित वस्तूंमुळे रेल्वेच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले तर दोषी प्रवाशाला त्या नुकसानाची भरपाई देखील करावी लागेल.”

 

Dried Coconut

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार मद्यधुंद अवस्थेत ट्रेनमध्ये प्रवास करणे महागात पडू शकते

भारतीय रेल्वेच्या नियमात असे म्हटले आहे की, “जर एखादा प्रवासी ट्रेनमध्ये प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करताना आढळला तर रेल्वे त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकते. अशा परिस्थितीत, प्रवाशाला 1000 रुपये दंड, तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर प्रतिबंधित वस्तूंमुळे रेल्वेच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले तर दोषी प्रवाशाला त्या नुकसानाची भरपाई देखील करावी लागेल.”

कोणताही प्रवासी मद्यधुंद अवस्थेत आढळला तर कोणता दंड? 

एवढेच नाही तर जर एखाद्या प्रवाशाने ट्रेनमध्ये दारू प्यायली तर रेल्वेच्या नियमांनुसार, कोणताही प्रवासी मद्यधुंद अवस्थेत ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही. यासाठी 1989 च्या रेल्वे कायद्याच्या कलम 165 अंतर्गत कठोर कायदे करण्यात आले आहेत. नियमात असे म्हटले आहे की जर कोणतीही व्यक्ती किंवा प्रवासी ट्रेन किंवा रेल्वे परिसरात मद्यधुंद अवस्थेत अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळला किंवा इतर प्रवाशांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे तिकीट रद्द केले जाऊ शकते. एवढेच नाही तर दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 500 रुपये दंड होऊ शकतो.