कामिका एकादशी 2025: कामिका एकादशीला ‘या’ ठिकाणी लावा दिवे, झोपलेले भाग्य होईल जागे

कामिका एकादशी 21 जुलै रोजी येत आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. तसेच एकादशीच्या दिवशी या ठिकाणी दिवे लावून पूजा केल्यास तुमचे भाग्य जुळते. चला तर मग जाणून घेऊयात कामिका एकादशीला कोणत्या ठिकाणी दिवे लावावेत.

कामिका एकादशी 2025: कामिका एकादशीला या ठिकाणी लावा दिवे, झोपलेले भाग्य होईल जागे
KAMIKA EKADASHI 2025
| Edited By: | Updated on: Jul 21, 2025 | 11:30 AM

हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील तिथीला एकादशीचे व्रत केले जाते. एकादशीला विष्णून पूजेला महत्व असते. शिवाय चातुर्मासातही विष्णूपुजेला विशेष महत्त्व असते. तर यंदा कामिका एकादशी 21 जुलै रोजी येत आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. यासोबतच जीवनात आनंद येतो. त्याचवेळी या दिवशी दिव्याचे काही प्रभावी उपाय सांगितले आहेत. ते उपाय केल्याने आपले भाग्य उजळते. चला तर मग जाणून घेऊयात या उपायांबद्दल.

कामिका एकादशी व्रत महत्व

कामिका एकादशी चातुर्मासात येत असल्याने याचे विशेष महत्व आहे. या व्रतामुळे आपल्याकडून अजाणत्यापणे झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते. कामिका एकादशीच्या व्रताचे यज्ञांप्रमाणे फळ मिळते. या दिवशी विष्णूंना तुळस अर्पण केल्याने पितृदोष मुक्त होतो.

कामिका एकादशीला या ठिकाणी दिवे लावून करा हे प्रभावी उपाय

तुळशीच्या झाडाजवळ – तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. कामिका एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि दारिद्र्य दूर होते. यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

मुख्य दारावर – घराच्या मुख्य दारावर दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. अशावेळेस कामिका एकादशीच्या संध्याकाळी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना दिवा लावावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरात सकारात्मकता पसरते.

मंदिरात किंवा पूजास्थळी – या शुभ दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात किंवा तुमच्या घरातील पूजास्थळी दिवा लावा. कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीसमोर दिवा लावल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि सर्व त्रास दूर होतात.

पिंपळाच्या झाडाखाली – पिंपळाचे झाड देवांचे निवासस्थान मानले जाते. अशा परिस्थितीत कामिका एकादशीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा नक्कीच लावावा. असे केल्याने पितरांना शांती मिळते आणि भाग्य वाढते.

बिल्वपत्राच्या झाडाखाली – कामिका एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असली तरी भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणून, या दिवशी शिव मंदिरात किंवा बिल्वपत्राच्या झाडाखाली दिवा लावा. असे केल्याने तुम्हाला भगवान शिव आणि विष्णूचे आशीर्वाद मिळतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)