थंडीपासून बचाव करण्यासाठी रूम हीटर खरेदी करायचा विचार करताय? तर त्याआधी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

कडाक्याच्या हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्हीही घरात रूम हीटर लावण्याचा विचार करताय तर खरेदी करताना अनेक घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. चला तर मग रूम हिटर खरेदी करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...

थंडीपासून बचाव करण्यासाठी रूम हीटर खरेदी करायचा विचार करताय? तर त्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात
Room Heater
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Dec 12, 2025 | 7:45 PM

महाराष्ट्रात काही राज्यांमध्ये किमान तापमानात घट होत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडक थंडावा जाणवत असल्याने आता थंडीचा जोर आणखीन वाढतांना दिसून येत आहे. अशातच आपल्यापैकी अनेकजण या कडाक्याच्या थंडीत स्वतःला उबदार ठेवण्यासाठी रूम हीटर खरेदी करण्याकडे वळत आहेत. जर तुम्ही या हंगामात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी हीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या संबंधित काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. बाजारात अनेक प्रकारचे हीटर उपलब्ध आहेत, त्यामुळे तुमच्या गरजांसाठी योग्य हीटर निवडणे महत्त्वाचे आहे. आज, आपण हीटरबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत.

खरेदी करण्यापूर्वी गोष्टींचा निर्णय घ्या

हीटरचे प्रकार

बाजारात हॅलोजन हीटर, फॅन हीटर आणि ऑइल हीटरसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हॅलोजन हीटर लहान खोल्यांमध्ये वापरता येतात आणि ते योग्य दरात तुम्हाला खरेदी करता येते. दुसरीकडे ऑइल हीटर मोठ्या घरांसाठी असतात आणि वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित असतात. त्याचप्रमाणे फॅन हीटर हॅलोजन हीटरपेक्षा सुरक्षित असतात, परंतु त्यांची किंमत देखील जास्त असते.

खोलीच्या आकारानुसार हीटर खरेदी करा

तुमची खोली लहान असेल तर तुम्ही त्यानुसार हिटरची खरेदी करा. लहान खोल्यासाठी हॅलोजन हीटर आवश्यकता असते. मध्यम आकाराच्या खोलीसाठी फॅन हीटर सर्वोत्तम आहे. तर खोली मोठी असेल तर ऑइल हीटर सर्वोत्तम आहे.

ऑइल हीटर हा एक सुरक्षित पर्याय आहे

ऑइल हीटर इतर दोन हीटरपेक्षा वापरण्यास अधिक सुरक्षित आहेत. ते तेलाने भरलेले असतात आणि हळूहळू गरम होतात. तथापि त्यांची किंमत हॅलोजन आणि फॅन हीटरपेक्षा खूपच जास्त असते.

हीटर वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही जर झोपताना तुमच्या खोलीत हीटर वापरत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. हॅलोजन आणि फॅन हीटरमुळे खोलीतील हवा अत्यंत कोरडी होऊ शकते. यामुळे हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी होते. यामुळे डोळे कोरडे पडणे आणि नाक बंद होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, खोलीत व्हेंटिलेशनसाठी थोडी जागा ठेवणे महत्त्वाचे आहे.