Mumbai Tourism : मुंबईतच आहे काशीची झलक; मुंबईच्या या भागाला मिनी काशी” का म्हणतात? जाणून घ्या सविस्तर

मुंबईच्या मलबार हिल परिसरातील वाळकेश्वर आणि बाणगंगा तलावाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. मंदिरं, तलाव आणि प्राचीन वास्तूंमुळे या परिसराला अनेकदा ‘मिनी काशी’ किंवा ‘मिनी बनारस’ म्हटलं जातं.

| Updated on: Oct 05, 2026 | 9:03 PM
1 / 8
वाळकेश्वराचे धार्मिक महत्त्व :  वाळकेश्वर परिसर याचा संबंध भगवान शिवाशी लावला जातो. इथलं वाळकेश्वर मंदिर मुंबईतील प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची विशेष रचना आणि आजूबाजूचा परिसर यामुळे या परिसराला वाराणसीचं महत्त्व आहे.

वाळकेश्वराचे धार्मिक महत्त्व : वाळकेश्वर परिसर याचा संबंध भगवान शिवाशी लावला जातो. इथलं वाळकेश्वर मंदिर मुंबईतील प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची विशेष रचना आणि आजूबाजूचा परिसर यामुळे या परिसराला वाराणसीचं महत्त्व आहे.

2 / 8

वाळकेश्वराची आख्यायिका : वाळकेश्वर मंदिराशी संबंधित एक आख्यायिका सांगितली जाते. रामायणाच्या काळात श्रीराम लंकेकडे जात असताना या परिसरात थांबले होते आणि येथेच त्यांनी शिवाची वाळूची पिंड बनवली होती.

3 / 8

वाळकेश्वर असे नाव का पडले : वाळू आणि त्यापासून तयार झालेला ईश्वर त्यामुळे या ठिकाणाला वाळकेश्वर असे नाव प़डले. असे सांगितले जाते.

4 / 8

बाणगंगा तलावाच महत्त्व : लंकेकडे जाताना जेव्हा श्रीरामांना वाटेत तहान लागली होती, तेव्हा त्यांनी बाण मारून पाण्याचा झरा निर्माण केला. पाताळगंगेचे पाणी रामांनी बाण मारून बाहेर काढल्याने या तलावाला बाणगंगा असे नाव पडले. असे कथा पुराणांमध्ये सांगितले जाते.

5 / 8

बाणगंगा तलावाभोवती मंदिरांची रांग : बाणगंगा तलावाच्या आसपास अनेक छोटी-मोठी मंदिर पाहायला मिळतात. तलाव,मंदिर आणि जुन्या वास्तुंमुळे या परिसराला एक वेगळंच धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व मिळालं आहे.

6 / 8

मिनी काशी का म्हणतात : काशीप्रमाणेच वाळकेश्वर परिसरात शिवभक्ती मंदिर, धार्मिक विधी आणि पवित्र जलाशी संबंधित श्रद्धा पाहायला मिळते. याच धार्मिक वातावरणामु्ळे मिनी काशी म्हणून संबोधले जाते.

7 / 8

मिनी काशी कुठे आहे? : मुंबईच्या दक्षिण भागातील मलबार हिल परिसरात असलेल्या वाळकेश्वर आणि तेथील बाणगंगा तलाव या परिसराला मुंबईची मिनी काशी किंवा मिनी बनारस म्हटले जाते.

8 / 8

टीप : वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us