AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: बळीराजावर संकट, दुष्काळाचे सावट, कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदे यांचे विठुरायाला काय साकडे?

Eknath Shinde in Pandharpur: कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला मिळाला. दुष्काळाचे सावट गडद असताना एकनाथ शिंदे यांनी विठुरायाला मोठे साकडे घातले.

Eknath Shinde: बळीराजावर संकट, दुष्काळाचे सावट, कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदे यांचे विठुरायाला काय साकडे?
बळीराजावर संकट, दुष्काळाचे सावट, शिंदे यांचे विठुरायाला काय साकडे?
| Updated on: Nov 21, 2026 | 6:33 AM
Share

Eknath Shinde in Pandharpur: कार्तिकी एकादशीनिमित्त आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला मिळाला. आज पहाटे अडीच वाजता एकनाथ शिंदे सपत्नीक आणि शेतकरी दाम्पत्याने पांडुरंगाची पूजा अर्चना केली. मुख्यमंत्री होतो तेव्हा वारकरी म्हणून आलो होतो. आज उपमुख्यमंत्री म्हणून आलो, वारकरी म्हणून आलो. बळीराजावरील संकट, दुष्काळाचे सावट दूर कर आणि बळीराजाला ताकद दे असे साकडे शिंदे यांनी विठुरायाला घातले. विठूरायाच्या गजरात आज पंढरपूर नगरी दुमदुमली. हरिनामाचा जयघोष झाला. पंढरपुरात भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. विठुरायाच्या पंढरीत भक्तीमय वातावरण दिसून येत आहे.

बळीराजाला ताकद दे

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर ते घुमान या सायकलवारील झेंडा दाखवला. पांडुरंगाच्या आशीर्वादाची ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन हे सायकलपटू पंजाब येथील घुमानला निघाले आहेत. बळीराजावरील संकट, दुष्काळाचे सावट दूर कर आणि बळीराजाला ताकद दे असे साकडे विठुरायाकडे घातले. आज अनेक तरुण आणि ज्येष्ठ सायकलपटू पंढरपूरहून घुमानला निघाले आहेत. त्यांच्या या सायकलवारीला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी आणि मुलगाही यावेळी उपस्थित होते.

पांडुरंगाने महापूजेची इच्छा पूर्ण केली

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील शेतकरी भाविक सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रणिता सुधाकर शिंदे या दांपत्याला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी आपणाला ही वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजा करण्याची संधी मिळावी अशी मनोमन इच्छा होती ती इच्छाच खरोखरच पांडुरंगाने पूर्ण केली अशी भावना वारकरी प्रतिनिधी सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केली.. आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून नांदेड जिल्ह्यातील उंचेगाव येथील शेतकरी सुधाकर शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता शिंदे यांना महापूजा करण्याचा मान मिळाला.

विठोबा मंदिरात कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न; पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ताकई येथील बोंबल्या विठोबा मंदिरात कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त महापर्वणी व महापूजा भक्तिभावाने संपन्न झाली. पहाटे ५ वाजल्यापासून विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या. यंदाच्या महापूजेचा मान काळोते गावातील अनंता पाटील यांना मिळाला. श्री विठोबा देवस्थान ताकई यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. संपूर्ण मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने भक्तिमय झाला. श्री विठोबा देवस्थान ताकाई यांच्या वतीने सर्व भाविकांची काजळी घेत छान अशी व्यवस्था करण्यात आली आहें.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर