
Women Leg Crossing Habits : दररोज लाखो महिला नकळतपणे त्यांचा एक पाय दुसऱ्यावर टाकून बसतात. त्याला इंग्रजीत लेग क्रॉस असे म्हणतात. अर्थात बसण्याची ही एक साधी सवय आहे. ती नकळतपणे घडते. नकळतपणे त्या तशी कृती करतात. पण त्यामागील दडलेला भाव पार जुना आहे. सामाजिक नियमांमध्ये असे पाय एकमेकांवर ठेवून स्त्रीयांनी बसणे जर असहज म्हटले जाते. पण ही मुद्रा अगदी नकळतपणे होते. त्याचा अर्थ काय होतो?
अनेकांना आश्चर्याचा धक्का
अनेक शतकांपासून स्त्रीया त्यांचे पाय क्रॉस करुन बसतात. हा एक शिष्टाचाराचा नियम मानल्या जातो. त्यातून त्यांचा विनम्रपणा आणि संयम व्यक्त होत असल्याचे मानल्या जाते. स्त्रीया लांब पोशाख घालत तेव्हा केवळ खालील पंजा क्रॉस असलेला दिसत असे. आता तरुणी लहान स्कर्टचा वापर करतात. त्यामुळे लेग क्रॉसिंग तळपायावरून आता थेट गुडघ्यांपर्यंत आले आहे. हे संकेत सामाजिक मानदंडांचं अथवा लज्जेचा भाव मानल्या जातो.
मनोवैज्ञानिक अर्थ काय?
या संकेतामागे एक मनोवैज्ञानिक कारण आहे. मानसशास्त्रानुसार, असे बसणे हे एक भाषेविना संवादाचा प्रकार आहे. ही बसण्याची मुद्रा, पद्धत ही सुरक्षितता, नम्रता आणि स्वतःवरील नियंत्रणाचा मिश्रीत भाव दर्शवते. शरीर भाषा तज्ज्ञांच्या मते, फॅशन म्हणून अथवा कपड्यांचे स्वातंत्र्य म्हणून स्त्रीया छोटे कपडे घालतात. पण ज्यावेळी त्या छोटे कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी बसतात. तेव्हा त्या संकोचतात आणि लज्जा भाव उत्पन्न होतो. त्यामुळे त्या पाय गुडघ्यापासून आडवा घेतात. शारिरीक ताण कमी करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीत काही महिला बसतात.
एक सामाजिक दडपण
विविध देशात, त्यांच्या संस्कृतीत महिलांवर एक सामाजिक दडपण असते. कितीही खुल्या विचारांचा देश असला तरी काही सामाजिक शिष्टाचार महिलांनी पाळावेत हा अलिखित नियम असतो. पुरुषांना सामाजिक संकेतांचं भान जपावे लागते. पण त्यांच्यावर ते पाळण्याचे बंधन नसते. तर स्त्रीयांवर एक नैसर्गिक अथवा सामाजिक मनोवैज्ञानिक दडपण असते. त्यामुळे जर कमी अथवा तोकडे घालून बसताना पायाद्वारे विशिष्ट अंग झाकण्याची गरज भासते. अनेकदा स्त्रीया पूर्ण कपड्यात असतानाही अशी कृती करतात, तेव्हा त्या शारीरिक ताण कमी करण्याचा अथवा मनातील उत्साह, अस्वस्थता, दडपण कमी करण्याचा प्रयत्न या कृतीतून करतात असा समज आहे. अर्थात ही कृती अनेकदा सहजपणे होते.