AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Senior Citizens Schemes : SBI ची 444 दिवसांची FD योजना! ₹5 लाख गुंतवल्यास मिळणार इतकं व्याज; ज्येष्ठ नागरिकांसाठी खास दर लागू

बँकेत पैसे ठेवण्यासाठी अनेक जण कोणत्या ना कोणत्या स्किमच्या शोधात असतो. खास करून वृ़द्धांसाठी पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे SBI बँकेने वृद्धांसाठी काही खास योजना तयार केल्या आहेत. त्याबद्दल जाणून घ्या सविस्तर

SBI Senior Citizens Schemes :  SBI ची 444 दिवसांची FD योजना! ₹5 लाख गुंतवल्यास मिळणार इतकं व्याज; ज्येष्ठ नागरिकांसाठी खास दर लागू
SBI SCHEMES NEWS Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 21, 2026 | 4:01 PM
Share

बँकेत पैसे ठेवायचे आहेत ? पण परताव्याची चिंता सतावते तर थांबा मग हि माहिती तुमच्यासाठीच आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत वृष्टी ठेव योजना अशा ग्राहकांसाठी एक पर्याय आहे. या योजनेचा कालावधी 444 दिवसांचा म्हणजे साधारण 14 दिवसांचा म्हणजे साधारण 14 महिने 19 दिवस आहे. विशेष म्हणजे सामान्य ग्राहक ज्येष्ठ नागरिक आणि 80 वर्षांवरील अतिज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदरही वेगवेगळे आहेत.

SBI अमृत वृष्टी योजना नेमकी काय आहे?

ही स्टेट बँक ऑफ इंडियाची विशेष मुदत ठेव योजना आहे. यात ठराविक कालावधीसाठी एकरकमी पैसे जमा करून त्यावर व्याज मिळवता येतं. या योजनेचा कालावधी 444 दिवसांचा आहे. त्यामुळे 5 किंवा 10 वर्षांसाठी पैसे अडकण्याऐवजी तुलनेने कमीा कालवधीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

सामान्य ग्राहकांना किती व्याज मिळतं ?

21 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध या योजनेत सामान्य ग्राहकांना वार्षिक 6.45 टक्के व्याजदर मिळतो.मात्र प्रत्यक्ष परतावा हा व्याज कसं दिलं जाणार आहे. योजनेच्या अटी आणि बँकेच्या गणनेवर अवलंबून असतो.

ज्येष्ठ नागरिकांना मिळतो अधिक व्याजदर

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक 6.95 टक्के व्याजदर नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळू शकतं.गुंतवणूक करण्यापूर्वी वयाशी संबंधित पात्रता आणि लागू व्याजदर बँकेकडून तपासून घ्या.

80 वर्षांवरील नागरिकांसाठी खास दर

80 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी नागरिकांना या योजनेत वार्षिक 7.05 टक्के व्याजदर मिळतो. हा सामान्य ग्राहकांच्या 6.45 टक्के दरापेक्षा जास्त आहे. मात्र प्रत्यक्षात किती रक्कम मिळेल , हे गुंतवणूकिची रक्कम आणि व्याजाच्या पर्यायानुसार ठरेल.

5 लाखांची FD केल्यास किती पैसे मिळतील?

समजा सामान्य ग्राहकाने 444 दिवसांसाठी 5 लाख रूपये गुंतवले आणि 6.45 टक्के व्याजदर लागू झाला. तर तिमाही चक्रवाढीच्या आधारे मुदतपूर्तीची रक्कम अंदाजे 5.40 लाख रूपये होऊ शकते.म्हणजेच 40 हजार रूपये मिळू शकतात. हा केवळ अंदाज आहे. व्याज देण्याचा पर्याय, बँकेची गणना आणि लागू अटींनुसार अंतिम रक्कम बदलू शकते.

10 लाख रुपये गुंतवल्यास किती परतावा मिळेल?

याच अंदाजित गणनेनुसार सामान्य ग्राहकाने 10 लाख रूपये गुंतवल्यास 444 दिवसांनंतर रक्कम अंदाजे 10.81 हजार रूपये मिळू शकते. म्हणजेच व्याज साधारण 81 हजार रूपये मिळू शकतं.

किमान किती रक्कम जमा करता येते?

या योजनेत किरकोळ ठेवीसाठी किमान 1,000 रूपये जमा करता येतात.गुंतवणूकीसाठी रक्कम 3 कोटी रूपयांपेक्षा कमी असावी.

मुदत संपण्याआधी पैसे काढले तर काय होईल?

444 दिवस पूर्ण होण्यापूर्वी पैशांची गरज पडल्यास FD मुदतपूर्वी बंद करण्याची सुविधा असू शकते. मात्र त्यासाठी बँकेच्या नियमानुसार दंड लागू होऊ शकतो. 5 लाख रूपयांपर्यंतच्या ठेवीवर 1 टक्के दंड लागू होऊ शकतो.

Follow Us
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र