पावसाळ्यात साप घरात नाही शिरणार, ते चार जबरदस्त उपाय… खबरदारी घेतल्यानेच धोका टळणार

what is to prevent snakes from entering in home : पावसाळ्यात साप घरात शिरण्याची आणि मोठा धोका होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी या चार जबरदस्त उपायांनी तुम्ही संभाव्य धोका टाळू शकता. काय घ्यावी लागणार खबरदारी?

पावसाळ्यात साप घरात नाही शिरणार, ते चार जबरदस्त उपाय... खबरदारी घेतल्यानेच धोका टळणार
ते चार जबरदस्त उपाय..
| Updated on: Jun 26, 2026 | 4:36 PM

Snake Facts: पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडल्यानंतर अनेक उंचसखल भागात पाणी शिरते. साप ज्या अडगळीच्या जागी राहतात. तिथे पाणी शिरते, बिळातही पाणी शिरते अशावेळी साप सुरक्षित जागा शोधतो. पावसाळ्यात थंड ठिकाण सोडून साप जिथे अधिक उब मिळते अशा ठिकाणं शोधतात. त्यामुळे ते घरात शिरण्याची अथवा गोठ्यात शिरण्याची भीती वाढते. सापांना घरात शिरण्यापासून रोखण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. अर्थात या घरगुती उपायांनी साप घरात शिरण्याचा धोका कमी होतो.

काय आहेत ते उपाय?

दरवाजा, भिंती, खिडकीच्या पोकळी भरून काढा

मुख्य दरवाजा, परसबागेकडील दरवाजा, खिडक्या, भिंत यामध्ये पोकळी असेल. घरात घुसण्यासाठी फट असेल तर ती अगोदर बुजवा. दरवाज्या खालील भाग मोकळा असेल तर मॉलमध्ये त्याच्या खाली लावण्यासाठी पट्टी मिळते. त्यामुळे दरवाजाची फट बुजते आणि घरात साप अथवा इतर कीटक येऊ शकत नाहीत. व्हेंटिलेशनच्या ठिकाणची जागा अधिक खरबडी असेल तर धोका कमी होईल.

घराशेजारी उंदीर नसेल याची काळजी घ्या

साप खाद्याच्या शोधात अनेकदा घराच्या जवळपास येतो. तुमच्या घराच्या जवळ जर उंदीर, घुस अथवा बेडूक यांचे प्रमाण अधिक असेल तर सापाचा धोका वाढतो. कारण त्याला आयते खाद्य मिळते. या शिकारीच्या शोधात साप थेट घरात येऊ शकतो. परसबागेत येऊ शकतो. त्यामुळे परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. घाण साचू देऊ नका.

ड्रेनेज सिस्टिम आणि पाईप्सला जाळी लावा

पावसाळ्यात ड्रेनेज सिस्टिम अथवा जे इतर पाईप्स घरात येतात त्यांना जाळी लावा. कारण या भागातूनही साप थेट घरात येण्याची दाट शक्यता असते. जाळी लावल्याने साप घरात येणार नाही. पाणीही बाहेर जाईल. तर घराच्या आजूबाजूला पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

साप घरात शिरू नये यासाठी काही जण नारळाच्या शेंड्याचा वापर करतात. घराच्या मुख्यदारासमोर अथवा घराच्या आसपास नारळाच्या शेंड्यांचा वापर करतात. त्यामुळे सापाची पकड सुटते. साप याभागात पुढे जात नाही असे सांगितले जाते.

Follow Us