Snake Facts: फू…फूस्स! सापाचा विचित्र आवाज, भल्या भल्या पैलवानाचा उडतो थरकाप, हळूच ठोकतात धूम…

snake hissing sound: साप पाहिला तरी अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो. पण काही साप असा काही विचित्र आवाज काढतात की भल्या भल्या पैलवानाची भीतीने गाळण उडते. जगात काही साप विचित्र आवाज काढतात.

Snake Facts: फू...फूस्स! सापाचा विचित्र आवाज, भल्या भल्या पैलवानाचा उडतो थरकाप, हळूच ठोकतात धूम...
या सापाचा विचित्र आवाज, भल्या भल्या पैलवानाचा उडतो थरकाप
| Updated on: Oct 27, 2026 | 1:52 PM

snake hissing sound: साप पाहिला तरी अनेकजण धूम ठोकतात. साप चार हात दूर असला तरी अनेकांना धडकी भरते. काही सापांना निसर्गाने कवच कुंडलं दिली आहे. काही साप असा भयावह आवाज काढतात की भल्या भल्या पैलवानांची भीतीने गाळण उडते. त्यांच्या आवाजानेच काळजाचा थरकाप उडतो. केवळ फुस्स नाही तर काही साप शेपटीच्या मदतीनेही विचित्र आवाज करतात. समोरच्याला ही धोक्याची सूचना असते.

फुरसे अत्यंत जहाल साप

Loading...

भारतात फुरसे हा अत्यंत जहाल आणि विषारी साप म्हणून ओळखल्या जातो. तो अत्यंत विषारी आणि धोकादायक साप म्हणून ओळखल्या जातो. या सापाची शारीरिक रचना इतर सापांपेक्षा थोडी वेगळी आहे. तो बचावासाठी स्वतःला 8 या इंग्रजी आकड्यासारखा स्वतःला गुंडाळून घेतो. त्यानंतर तो त्याच्या शरीरावरील खवले एकमेकांवर अधिक वेगाने घासतो. या घर्षणामुळे फुर, फुर असा अत्यंत कर्कश आणि भीतीदायक आवाज बाहेर पडतो. एखाद्या यंत्रणाच्या घर्षणासारखा हा आवाज असतो. हा आवाज अत्यंत विचित्र आणि भयावह असल्याने अनेक प्राणी, पशू पक्षी आणि मानव सुद्धा जागीच थबकतो आणि सावध पवित्रा घेतो.

विचित्र आवाज काढणारे साप कोणते?

केवळ फुरसेच नाही तर अमेरिकेतली रॅटलस्नेकही त्याच्या विचित्र आवाजासाठी प्रसिद्ध आहे. हा साप आपल्या शेपटीच्या शेवटी असलेल्या निमुळते टोक आदळून झिझिझिझि… असा आवाज काढतो. या आवाजाने अनेक प्राणी पळ काढतात. तर नाग आणि धामण हे प्राणी सुद्धा समोर संकट आले तर फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर सोडतात आणि मोठा फूत्कार सोडतात. पण शरीराचे खवले घासून फुरसे विचित्र आवाज काढतात.

सापाच्या शरीरात स्वरयंत्र नसते. पण तरीही ते आवाज काढतात. स्वतःच्या रक्षणासाठी आणि शत्रूला सावध करण्यासाठी साप हा आवाज काढतो. स्वतःला धोका जाणवला तेव्हा साप हा असा विचित्र आवाज काढतो. तो बचावाच्या पवित्र्यात येतो. काही साप हे शरीरातील विशिष्ट हालचालीच्या मदतीने हा विचित्र आवाज काढतात. तर काही साप हे फुफ्फुसातील हवा जोराने सोडतात. त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो. त्यातून एक आवाज निर्माण होतो. त्याला फुत्कारणे असे म्हणतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us