आज सर्वात मोठे सूर्यग्रहण, 6 मिनिटे 23 सेकंद दिवसा होणार काळोखा, 75 वर्षानंतर..

Solar Eclipse August : आज सर्वात मोठे सूर्यग्रहण आहे. दिवसाच थेट काही मिनिटे सर्वत्र काळोखा पसरणार आहे. अनेक देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. तब्बल 75 वर्षानंतर इतके मोठे सूर्यग्रहण दिसणार आहे.

आज सर्वात मोठे सूर्यग्रहण, 6 मिनिटे 23 सेकंद दिवसा होणार काळोखा, 75 वर्षानंतर..
Solar Eclipse
| Updated on: Aug 03, 2026 | 12:15 PM

2 ऑगस्टला मोठे खग्रास सूर्यग्रहण लागणार आहे. यादरम्यान दिवसात थेट काहीवेळ अंधार होईल. तब्बल 6 मिनिटे 23 सेकंद हे ग्रहण राहणार आहे. एकाच महिन्यात एक सूर्यग्रहण आणि दुसरे चंद्रग्रहण दिसणार आहे. साैदी अरेबिया या खगोलीय घटनेचा साक्षीदार होण्यास तयार आहे. हे एक दुर्मिळ सूर्यग्रहण असणार आहे. यादरम्यान काही मिनिटे दिवसा अंधार होणार आहे. सूर्याचे वलय पूर्णपणे झाकले जाईल. शास्त्रज्ञ या ग्रहणाला शतकातील सूर्यग्रहण म्हणत आहेत. कारण हे 21 व्या शतकातील सर्वात जास्त काळ टिकणारे ग्रहण आहे. ग्रहणाची सावली साैदी अरेबियावर पडेल. तेथील नागरिक आरामात हे ग्रहण बघू शकणार आहेत. यादरम्यान सूर्याभोवती मोठ्या घडामोडी घडताना दिसतील. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण इतर देशात दिसणार आहे.

तब्बल 75 वर्षानंतर साैदी अरेबियामधून पाहिले जाणारे हे पहिले ग्रहण आहे. ज्यावेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच रेषेत येतात, त्यावेळी सूर्यग्रहण होते. हा एक खगोलशास्त्रीय योगायोग आहे. चंद्र सूर्याला पूर्ण झाकतो. अटलांटिक महासागरात हे ग्रहण सुरू होईल, त्यानंतर तांबडा समुद्रा पार करत उत्तर आफ्रिका, मोरोक्को, इजिप्त, सोमालिया आणि तिथून साैदी अरेबियात प्रवेश करेल.

हे ग्रहण 2 ऑगस्ट 2026 रोजी युरोप, उत्तर आफ्रिका, अरबस्तानच्या काही भागात दिसेल. हे 2 ऑगस्ट म्हणजेच उद्याचे हे ग्रहण खूप जास्त खास असणार आहे. सूर्य दिवसा काही काळ नाहीसा होईल. सहा मिनिटे जग अंधारात जाईल. साैदी अरेबियाच्या अंतराळ संस्थेनुसार, हे ग्रहण 6 मिनिटे टिकेल, काही ठिकाणी 6 मिनिटे 19 सेकंद टिकेल.

2 ऑगस्ट रोजी दिसणारे हे सूर्यग्रहण 275 किलोमीटर रूंद असेल.आफ्रिकेच्या जवळपास देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीये. हे यंदाच्या वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे. अनेक देशात हे ग्रहण दिसले. ग्रहणाच्या काळात सूर्याभोवती अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसतात. अनेक संशोधने यादरम्यान केली जातात. खगोल शास्त्रज्ञांकडून ग्रहण सुरू होण्यापूर्वीच तयारी सुरू आहे. लोकही हे ग्रहण बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us