AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिमार्टचा भोंगळ कारभार, थेट सॉफ्टी आयस्क्रीममध्ये किडा, तुकाराम मुंडेंकडे तक्रार..

डिमार्ट म्हटले की, सर्वांच्या आवडतीचे ठिकाण. अगदी कमी पैशात डिमार्टमध्ये वस्तू मिळतात. कधीही आणि कोणत्याही वेळेला डिमार्टमध्ये जा तिथे आपल्याला गर्दी कायमच मिळते. शिवाय डिमार्टमध्ये मिळणारी सॉफ्टी अनेकांना प्रचंड आवडते. मात्र, या सॉफ्टीबद्दलच धक्कादायक माहिती पुढे येतंय.

डिमार्टचा भोंगळ कारभार, थेट सॉफ्टी आयस्क्रीममध्ये किडा, तुकाराम मुंडेंकडे तक्रार..
DMart
| Updated on: Aug 02, 2026 | 3:00 PM
Share

डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर लोकांचा अधिक भर असतो. विशेष म्हणजे डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये वस्तू मिळतात. अनेक प्रकारच्या सवलती डिमार्टमध्ये असतात. अगदी कमी पैशांमध्ये तुम्ही महिन्याभराचा किराणा भरू शकता. घरात लागणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते. यासोबतच महिला कायमच लहान मुलांना डिमार्टमध्ये घेऊन जातात. तिथे पॉपकॉर्न आणि सॉफ्टी आयस्क्रीमही मिळते. बरेच लोक सॉफ्टी आयस्क्रीम खाण्यासाठीही तिथे जातात. हजारो लोक दररोज डिमार्टमध्ये खरेदीसाठी जातात. त्यात शनिवार रविवार म्हटले की, डिमार्टमध्ये मोठी गर्दी असते. शिवाय महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकांची अधिक गर्दी असते. डिमार्टमध्ये फिरून फिरून थकल्यानंतर सर्वांना तिथे मिळणारी सॉफ्टी आयस्क्रीम खायला आवडते. मात्र, आता नुकताच एक अत्यंत गंभीर प्रकार पुढे आला.

लोक डिमार्टमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची खरेदी करतात, त्याच डिमार्टमध्ये मिळणाऱ्या सॉफ्टी आयस्क्रीमध्ये चक्के किडा दिसून आला. या धक्कादायक प्रकरणानंतर थेट तक्रारदाराने तुकाराम मुंडे यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवली. नागपूरमधील बहादुरा येथील डिमार्टमध्ये एका ग्राहकाने सॉफ्टी आयस्क्रीम खरेदी केली.

त्यात चक्क जिवंत किडा दिसून आला. डिमार्ट येथील सॉफ्टी सर्वजणच आवडीने खातात. तिथे अशाप्रकारचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. नागपूरमधील बहादुरा येथे असलेल्या डिमार्टमधील सॉफ्टी मशीन आणि विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व खाद्यपदार्थांची तपासणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी करण्यात आली. आता तुकाराम मुंडे यांच्या निशाण्यावर राज्यातील डिमार्ट येऊ शकतात.

तसे निवेदनही अन्न आणि औषध प्रशासनाकडे देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात छापेमारी सुरू आहे. विविध हॉटेलची तपासणी केली जात आहेत. काहींचे थेट परवानेही रद्द करण्यात आलीत. मात्र, काही अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात एकवटली आहेत. त्यांना सतत काम लागत असून सुट्टी मिळत नाही. कामाचा ताण प्रचंड वाढल्याचे म्हणत त्यांनी तुकाराम मुंडे यांच्याविरोधात निवेदन दिले. भेसळयुक्तांचे धाबे तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर दणाणली आहेत.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं