वेश्या व्यवसाय, सेक्स,दाढी, स्तन झाकण्यासाठीही कर भरावा लागायचा; जगातील विचित्र टॅक्सबद्दल तुम्हाला माहितीये का?
2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर झाला. त्यात काय महाग, काय स्वस्त हे सर्वांना समजलं. पण तुम्हाला माहितीये का जगात लघवी करण्यापासून ते सेक्स करण्यावरही टॅक्स लावला जायचा. होय जगातील अशाच काही विचित्र टॅक्सबद्द जाणून घेऊयात.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग याकडे सर्वांचेच लक्ष होतं. पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे सर्वांच्या नजरा या ट्रक्सकडे लागल्या होत्या. यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्सची जोरदार चर्चा झाली. कारण करात तशी सूटही मिळाली. मात्र जगात असेही काही कर भरले जायचे ज्याची कल्पनाही कधी कोणी करू शकणार नाही.
असा विचित्र कर कधी ऐकला नसेल
कोणी तुम्हाला सांगितलं की उद्यापासून तुम्हाला दाढी वाढवण्यावर, लघवीसाठी एवढच काय तर चक्क सेक्ससाठीही कर भरावा लागणार तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण असे आणि याहूनही विचित्र कर पूर्वी होते ते लोकांना भरावे लागायचे. आज आपण अशाच काही विचित्र करांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
दाढीसाठी कर भरावा लागायचा
यातला पहिला कर म्हणजे दाढी वाढवण्यावर कर. 1535 मध्ये सम्राट हेन्री यांने दाढीवर कर लादला होता. त्यावेळी इंग्लंडमधील सर्वांना आश्चर्य वाटले होते. हेन्रीनंतर त्याच्या मुलीने देखील हा कर पुढे सुरु ठेवला होता. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ मोठी दाढी ठेवल्यास कर वसूल केला जाणार असा नियम होता. आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे कर वसुलीच्या वेळी घरातून कोणी पळून गेले तर शेजाऱ्यांना पैसे द्यावे लागायचे.
सेक्सवरही कर लावण्यात आला होता
1971 मध्ये डेमोक्रॅटिक राज्याचे आमदार बर्नार्ड ग्लॅडस्टोन यांनी सेक्सवरही कर लादला होता. सेक्ससाठी त्यांनी दोन डॉलर्सचा कर लागू केला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.शिवाय प्रांताची आर्थिक स्थिती बिकट असल्याने हा कर मागे घेण्यात आला.
वेश्या व्यवसायासाठी कर
जर्मनीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही कर भरावा लागायचा. या महिलांना दरमहा 150 रुपये कर भरावा लागत होता. हा कर 2004 मध्ये लागू केला गेला. कारण जर्मनीमध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे आणि सरकार त्यातून मोठ्या प्रमाणावर फायदा घेते.
लघवीवर कर
प्राचीन काळी लघवीवर कर वसूल केला जात असे. हे विचित्र असली तरी होय हे खरं आहे. कारण लघवीमध्ये अमोनियाच्या असल्यामुळे त्याचा उपयोग अनेक गोष्टींमध्ये केला जायचा. यामुळे रोमच्या राजाने सार्वजनिक मूत्रालयातील मूत्र वितरणावर कर लादण्यास सुरुवात केली होती.
स्तन झाकण्यासाठी कर आकारला जायचा
1729, मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये त्रावणकोर राज्याची स्थापना झाली. मार्तंड वर्मा हा तेव्हा राजा होता. जेव्हा साम्राज्य निर्माण होते तेव्हा नियम आणि कायदे केले जातात. त्याच परंपरेनुसार या राजानेही अनेक वस्तुंवर टॅक्स लावले. पण असा एक टॅक्स होता जो प्रचंड चर्चेत आला. भारतात केरळच्या निम्न जातीतील महिलांच्या ब्रेस्ट झाकण्यावर त्याने टॅक्स लावला होता.
या महिलांनी ब्रेस्ट झाकले तर त्यांना टॅक्स द्यावा लागत होता. दलित आणि ओबीसी महिलांवर हा कर लादण्यात आला होता. त्रावणकोरमध्ये दलित आणि ओबीसी जातीतील स्त्रिया केवळ कमरेपर्यंत कपडे घालू शकत होत्या. अधिकारी आणि उच्चवर्णीय लोकांसमोरून जाताना तिला तिची छाती उघडी ठेवावी लागायची.
महिलांना त्यांचे स्तन झाकायचे असतील तर त्याऐवजी त्यांना स्तन कर भरावा लागेल. या कराचे नाव होते मूलाक्रम. एका महिलेने हा टॅक्स देण्यास विरोध करत आपले स्तन कापून टाकले होते. त्यानंतर तिचा मृत्यू झाला आणि राजाला हा टॅक्स बंद करावा लागला.
चक्क आत्म्यावरही कर लावला होता
रशियाच्या राजाने तर चक्क आत्म्यावरही कर लावला होता. म्हणजे आत्म्यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना कर भरावा लागत होता. मात्र, धार्मिक श्रद्धा न पाळणाऱ्यांनाही कर भरावा लागायचा. हा कर रशियाचा राजा पीटर द ग्रेट याने 1718 मध्ये लागू केला होता.
हो होते जगातील काही विचित्र कर. ज्यांच्याबद्दल जाणून कोणालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. पण कालांतराने हे सर्व कर बंद करण्यात आले. जस जसे वेगवेगळ्या राजांचे राज्य प्रस्थापित झाले तस तसे कराचे स्वरुपही बदलत गेले.