AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नगर परिषदेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना पहिला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मोठी बातमी समोर येत आहे, रविवारी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला, या निकालानंतर आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! नगर परिषदेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना पहिला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 22, 2025 | 5:37 PM
Share

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा हादरला बसला, मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं तर दुसरीकडे मात्र महायुतीचा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दणदणित विजय झाला आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे,  तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला सर्वात मोठा फटका बसला आहे. दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल हाती येताच  आता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांमध्येच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजू वैद्य यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र हे यश महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये टिकवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला, भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग झालं, दरम्यान अजूनही हे इनकमिंग सुरूच आहे. पक्षाला लागलेली गळीत थांबवण्याचं मोठं आवाहान आता शिवसेना ठाकरे गटापुढे असणार आहे.  पक्षाला लागलेली गळती शिवसेना ठाकरे गटासाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहेत, त्यातच आता राजू वैद्य यांनी देखील राजीनामा दिला आहे.

दरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट मनसेसोबत युती करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बोलणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच युतीसंदर्भात घोषणा होऊ शकते, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गट देखील शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती करणार असल्याची शक्यता आहे.

मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.