AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप विषारी आहे की बिनविषारी? दुरूनच कसे ओळखणार? जाणून घ्या…

Venomous Snake Identification : पावसाळ्यात साप बाहेर पडतात. नागपूर शहरात एका महिन्यात 62 जणांना सर्पदंश झाल्याचे समोर आले आहे. या दिवसात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. साप विषारी आहे की बिनविषारी हे दुरूनच कसे ओळखावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

साप विषारी आहे की बिनविषारी? दुरूनच कसे ओळखणार? जाणून घ्या...
| Updated on: Jul 11, 2026 | 6:48 PM
Share

Venomous Snake Identification : पावसाळ्यात साप बाहेर पडतात. सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी ते घराशेजारची अडगळ जागा शोधतात. कधी कधी घरात येतात. सर्पदंश होण्याचे प्रमाण या काळात वाढते. घरातील सामान हलवताना अथवा नकळत साप हल्ला करतात. सर्वच साप काही विषारी नसतात. पण काही साप अत्यंत विषारी असतात. साप दिसताच तो विषारी आहे की बिनविषारी हे ओळखता येते का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. काय आहे त्याचे उत्तर?

तर केवळ दिसण्यावरून साप विषारी आहे की बिनविषारी आहे हे ओळखता येत नाही. त्यामुळे साप दिसताच त्याला पकडण्याची चेष्टा अंगलट येऊ शकते. सापापासून सुरक्षित अंतर ठेवा. सर्पमित्राशी अगोदर संपर्क साधा. त्याला तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका.

विषारी सापाविषयीचे ठोकताळे

काही वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, अनेक विषारी सापांचे डोके त्रिकोणी आकाराचे असते. विषग्रंथींना जागा मिळावी यासाठी त्यांचा जबडा रूंद असतो. तर बिनविषारी सापांचे डोके हे गोल अथवा अंडाकृती असते. काही विनविषारी साप बचावासाठी त्यांचा फणा मोठा करतात. त्यामुळे केवळ फण्याच्या आकारावरूनही साप विषारी आहे की बिनविषारी हे लक्षात येत नाही. त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये.

Britannica च्या माहिती आधारे काही तज्ज्ञांचा दावा आहे की, विषारी सापांच्या डोळ्यांच्या बाहुल्या या मांजरांच्या डोळ्यांप्रमाणे उभ्या आणि लांबट असतात. तर बिनविषारी सापांच्या बाहुल्या गोलाकार असतात. पण प्रकाशानुसार, बाहुल्यांचा आकार बदलू शकतो. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखणेच बचावा सर्वात मोठा पर्याय आहे.

Elorida Museum च्या एका संशोधनानुसार, काही सापांच्या शेपटी खालील खवल्यांची रचना वेगळी असू शकते. तर रॅटलस्नेकसारख्या सापांच्या शेपटीत झुनझुन्यासारखा आवाज येतो. पण भारतात आढळणाऱ्या बहुतेक विषारी सापांसाठी ही खूण काही लागू होत नाही.

National Geographic नुसार काही विषारी सापांच्या डोळे आणि नाकादरम्यान मध्यभागी उष्णता जाणवण्यासाठी एक छोटे खळगे असते. काही विषारी सापांचा रंग अतिशय आकर्षक आणि गडद असू शकतो. पण या लक्षणावरूनही साप विषारी आहे की बिनविषारी हे सांगता येत नाही.

सुरक्षिततेसाठी करा हे उपाय

सापापासून सुरक्षित अंतर ठेवा

सापाला मारण्याचा, पकडण्याचा प्रयत्न करू नये

परिसरातील वनविभाग, सर्पमित्र अथवा अधिकृत संस्थेशी संपर्क साधा

सर्पदंश झाल्यास तात्काळ रुग्णालयात जा. डॉक्टरकडे जा.

Follow Us
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?