
नातं टिकवणं हे जितकं अवघड असतं, तितकंच त्यात रोजच्या छोट्या सवयींचं योगदानही महत्त्वाचं असतं. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ज्या कपलमध्ये एकमेकांबद्दल समजूतदारपणा, प्रेम आणि आदर टिकून असतो, त्यांचं नातं इतरांसाठी प्रेरणादायी ठरतं. मग अशा नात्यांमध्ये गोडवा कसा टिकवायचा, हे प्रत्येक नवदांपत्याने समजून घ्यायला हवं.
आपल्यापैकी अनेकांनी असे कपल्स पाहिले असतील, जे एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहतात, एकत्र असताना सगळं काही विसरतात, आणि त्यांचं नातं इतकं सुंदर असतं की आजूबाजूचे लोक सहज म्हणतात “क्या जोड़ी है!” पण हे नातं नशिबावर नाही, तर काही खास सवयींवर उभं असतं. जर तुम्हालाही असं ‘हॅप्पी कपल’ व्हायचं असेल, तर आजपासूनच या 5 सोप्या सवयी आपल्या नात्यात आणा.
आजची धावपळ आणि डिजिटल व्यत्यय यामुळे जोडप्यांना एकमेकांसोबत पुरेसा वेळ मिळत नाही. पण क्वालिटी टाइम हा नात्याचा प्राण आहे. आठवड्यातून एकदा तरी एकत्र बसून चहा पिणं, फिल्म पाहणं किंवा गप्पा मारणं या छोट्या गोष्टी मोठं नातं तयार करतात.
बहुतांश लोक तक्रारी करायला वेळ काढतात, पण कौतुक करायला विसरतात. पार्टनरचा नवा ड्रेस, एखादं छोटंसं काम, स्वयंपाकात केलेलं काही वेगळं – यासाठी मनापासून “वा!” म्हणा. हे शब्द फक्त चेहऱ्यावर हास्यच आणत नाहीत, तर मनालाही जोडतात.
नात्यात पारदर्शकता हवीच. कोणतीही गोष्ट लपवून ठेवणं हे कालांतराने संशयाचं कारण बनतं. त्यामुळे, आनंद, राग, भीती, स्वप्न – सगळं काही एकमेकांसमोर उघडपणे मांडता यायला हवं. संवाद म्हणजे नात्याचं ऑक्सिजन आहे.
प्रेमात “मी मोठा, तू लहान” असं काही नसतं. पार्टनरच्या मतांचा, त्यांच्या स्पेसचा, त्यांचं व्यक्तिमत्त्वाचाही आदर करायला हवा. कुठल्याही क्षणी त्यांचं अपमान करणं, त्यांना लहान वाटणं हे नातं पोखरू शकतं. आदर असला, की विश्वासही असतो.
जीवनात कितीही टेन्शन असो, पार्टनरसोबत मोकळेपणाने हसणं नात्याला नवसंजीवनी देतं. कॉमेडी शो पाहा, एकत्र गेम्स खेळा, जुन्या आठवणींमध्ये रमून जा कारण मस्ती म्हणजे रिलेशनशिपचा ‘रिफ्रेश बटण’.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)