
नोकरीच्या पेशात अनेकदा आपण ब्ल्यू कॉलर जॉब, व्हाईट कॉलर जॉब असे शब्द ऐकले असतील. मात्र, या शब्दांचा नेमका अर्थ तुम्हाला माहिती आहे का ? वास्तविक हे शब्द वेगवेगळ्या नोकरी आणि काम करण्याच्या पद्धतीला दर्शवतात. काही जॉबमध्ये एसी ऑफीस मधून बसून काम करायचे असते तर काही जॉबमध्ये फिल्डवर काम असते. तर काही जॉब हे सेवा सेक्टर आणि काही तांत्रिक क्षेत्राशी संबंधित असतात.
अखेर पिंक, ब्ल्यु, व्हाईट आणि ग्रे कॉलर जॉब अखेर काय असतात ? यात काय असतो फरक पाहूयात…
कॉलर नोकरी एक असा शब्द आहे ज्याचा वापर नोकरीचा प्रकार आणि कामाच्या स्वरुपाला समजण्यासाठी हे शब्द वापरले जातात.
ब्ल्यू कॉलर जॉब कॅटगरीमध्ये ते लोक येतात जे लोक वेठबिगारी काम करतात. याचा अर्थ लोक शारीरिक श्रम करतात, अंगमेहनतीचे काम करतात. उदा. वेल्डर, मॅकनिक, मजूर आणि फॅक्ट्री वर्कर
व्हाईट कॉलर जॉबमध्ये त्या लोकांचा समावेश असतो. जे लोक ऑफीसमध्ये बसून काम करतात. या जॉबच्या कॅटगरीत स्किल्ड प्रोफेशनल काम करतात. उदा. मॅनेजर, इंजिनियर वा बँक कर्मचारी. म्हणजे याचे उत्तर स्पष्ट आहे की या कॅटगरीसाठी सुट आणि बुट परिधान करणारे आणि ज्यांच्या शर्टाची कॉलर रंग व्हाईट आहे.
या जॉबच्या कॅटगरीत त्या लोकांचा समावेश केला गेला आहे ज्यांच्याकडे खूप जास्त स्कील असते. उदा. डॉक्टर, वैज्ञानिक, वकील या श्रेणीत काम करणारे कंपनी चालवण्यासाठी मुख्य भूमिका निभावतात आणि त्यांच्या फिल्डचे एक्सपर्ट असतात.
या कॅटेगरीच्या जॉबमध्ये सेवा क्षेत्रातील लोक असतात. उदा. नर्स वा टीचर . या नोकऱ्यासाठी बहुतांश महिलांना घेतले जाते. त्यामुळे या जॉबला पिंक जॉब म्हटले जाते.
ग्रे कलर जॉबमध्ये त्या लोकांचा समावेश होतो जे व्हाईट आणि ब्ल्यू कॉलर जॉब्सच्या मध्ये काम करत असतात. यात तंत्रज्ञ, एक्सपर्टस सुरक्षा गार्ड आणि हेल्थ केअर सेक्टरमधील लोकांचा समावेश असतो.