AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress: महाविकास आघाडीत काँग्रेसचा बॉम्ब, उमेदवारीवरून सस्पेन्स वाढला, त्या एका अटीने अडचणीत ठाकरे सेना?

Congress- Shivsena: महाविकास आघाडीत सध्या बेबनाव झाल्याचे समोर येत आहे. अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करताना विश्वासात घेतलं नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता उणा पुरा एक तास उरलेला असताना कोणता बॉम्ब काँग्रेस टाकणार हा सस्पेन्स कायम आहे.

Congress: महाविकास आघाडीत काँग्रेसचा बॉम्ब, उमेदवारीवरून सस्पेन्स वाढला, त्या एका अटीने अडचणीत ठाकरे सेना?
महाविकास आघाडी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेनाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 2:10 PM
Share

Mahavikas Aaghadi Vidhan Parishad 2026: महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून तिढा सुटलेला नाही. त्यातच काँग्रेसने नाराजी व्यक्त केलेली आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात चर्चा सुरू आहे. पण ही चर्चा वांझोटी ठरण्याची चिन्हं अधिक आहे. कारण ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे बैठक सोडून विधान भवनात पोहचले आहेत. महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी घडत आहे. अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोप काँग्रेसने ठाकरे सेनेवर केला आहे. तर ठाकरे सेनेचे नेते हे काँग्रेसची मनधरणी करत आहेत. आता उणापुरा एकतास उरला आहे. काँग्रेसने जर उमेदवार जाहीर केला तर मग आघाडीची समीकरणं फिस्कटतील आणि राजकीय भविष्यावरही मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.

राज्यसभेची जागा काँग्रेसला द्या

मुंबईत गांधी भवन येथे सुरू असलेल्या बैठकीत काँग्रेसकडून ठाकरेंच्या सेनेला अट घातली आहे. राज्यसभेची एक जागा काँग्रेसला द्या आणि दोन परिषदेच्या जागा तुम्ही घ्या, असा प्रस्ताव काँग्रेसने दिलाय. नाही तर दोन विधान परिषदेच्या जागा आम्हाला द्या आणि राज्यसभा तुम्ही ठेवा असा ही काँग्रेस कडून शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते.

मात्र एक विधान परिषद देऊ असा ठाकरे गटाकडून प्रस्ताव देण्यात आला आहे. ही एक जागा आमच्या हक्काची असल्याची काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे चर्चा या भूमिकेवर अडून आहे. चर्चेचं गाडं इथंच अडकलं आहे. काँग्रेसचे नेते दिल्लीतील नेत्यांच्या सोबत बोलत आहेत. तर ठाकरेचं नेते उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करत आहेत. थोड्याच वेळात यावर निर्णय होणार आहे.

विजय वडेट्टीवार बैठक सोडून विधान भवनात

काँग्रेस कडून राज्यसभेची मागणी ही या बैठकीत ठेवण्यात आली आहे. काँग्रेस वर अन्याय होत आहे आणि काँग्रेस नेत्यांना विचारात कोणी घेत नाही असा सूर काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत आवळला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर हे बैठकीतून बाहेर पडले आहेत पण अद्याप ही बैठक सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळ आणि सतेज पाटील हे काँग्रेस नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत. लोकलेखा समितीच्या बैठकीला विजय वडेट्टीवार विधान भवनात गेले आहेत. मात्र सोबत एबी फॉर्म ही घेऊन गेले आहेत.

जर शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झालं नाही तर काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. त्यासाठी दोन एबी फॉर्मवरती विधानसभा सदस्यांच्या सह्याही घेण्यात आलेल्या आहेत. हे दोन ही फॉर्म विजय वडेट्टीवार यांच्या हातात आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या बैठकीत अद्याप देखील एकमत नाही. २०२८ ची राज्यसभेची जागा ही काँग्रेस ला देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस कडून करण्यात आली आहे. विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १ तास शिल्लक राहिले आहेत आणि अद्याप या दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक सुरू आहे. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था