AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

76 वर्षीय नाना पाटेकरांचा वर्कआऊट पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम; फिटनेसच्या धुरंधरांनाही टक्कर

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अतुल कस्बेकर यांनी नानांच्या वर्कआऊटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत.

76 वर्षीय नाना पाटेकरांचा वर्कआऊट पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम; फिटनेसच्या धुरंधरांनाही टक्कर
Nana PatekarImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2026 | 1:45 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या दमदार अभिनयकौशल्यासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. साधेपणा हीसुद्धा त्यांची एक ओळख आहे. परंतु आता नानांनी चाहत्यांसमोर त्यांची आणखी एक नवी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या 76 व्या वर्षी ते इतक्या सहजतेने अत्यंत कठीण वर्कआऊट करताना दिसत आहेत, जे पाहून फिटनेसच्या धुरंधरांनाही घाम फुटेल. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांची ऊर्जा आणि फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. फोटोग्राफर आणि निर्माते अतुल कस्बेकर यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नानांचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये नाना ट्रायसेप डिप्स करताना दिसत आहेत. अत्यंत साध्या पोशाखात आणि गळ्यात गमछा घालून ते हा वर्कआऊट करत आहेत. शरीरावर कोणताही अतिरिक्त ताण न देता अत्यंत सहजतेने आणि आरामात ते डिप्स करत आहेत. हा व्यायाम संपल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर जराही थकवा दिसत नाही. हा व्हिडीओ पोस्ट करत अतुल कस्बेकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘अहो नाना साहेब.. तुम्ही तर माझे फिटनेस गोल्सच (लक्ष्य) बदलले आहेत. हे आहेत नाना पाटेकरजी. यांचं वय 76 वर्षे आहे आणि हे आरामात बार्सवर ट्रायसेप डिप्स करत आहेत. यांनी 15 डिप्स पूर्ण केले आहेत (मी रेकॉर्डिंग थोडं उशिरा सुरू केलं होतं). मी काही दिवसांकरता थोडा निवांत असतो, परंतु तितक्यात नानासाहेब परत येतात.. खरोखरंच ते दिग्गज आहेत.’

पहा व्हिडीओ-

नानांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कमेंट बॉक्समध्ये टाळ्या वाजवतानाचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर ‘नाना सर.. तुम्ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहात’, असं एका युजरने म्हटलंय. ‘नानांनी पुतिन यांनाही मागे टाकलं आहे’, अशीही मजेशीर कमेंट दुसऱ्या युजरने केली आहे. ‘बापरे.. नाना कमाल’ असं म्हणत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेही टाळ्या वाजवतानाचे इमोजी पोस्ट केले आहेत.

नाना पाटेकर हे नुकतेच ‘ओ रोमियो’ आणि ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. याशिवाय त्यांनी अनिल कपूर आणि राधिका मदन यांच्या ‘सुभेदार’मध्येही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

Follow Us
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं.
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......