AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोपाळ आणि इंदूरमध्ये लागू होणारी पोलीस कमिशनर सिस्टीम नेमकी काय आहे? जाणून घ्या यामुळे काय बदल होणार?

पोलिसांना मॅजिस्ट्रेटचे अनेक अधिकार मिळतील. दंडाधिकार्‍यांचे अधिकार डीसीपी आणि एसीपी यांना कारवाईसाठी दिले जातील. सरकार शहरातील परिस्थितीनुसार एसपी दर्जाचे डीसीपी तैनात करेल.

भोपाळ आणि इंदूरमध्ये लागू होणारी पोलीस कमिशनर सिस्टीम नेमकी काय आहे? जाणून घ्या यामुळे काय बदल होणार?
भोपाळ आणि इंदूरमध्ये लागू होणारी पोलीस कमिशनर यंत्रणा नेमकी काय आहे?
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 3:05 PM
Share

इंदूर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजधानी भोपाळ आणि मिनी मुंबई म्हणून ओळख असणाऱ्या इंदूरमध्ये पोलीस आयुक्त प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही शहरांची कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सांगितले. ही प्रणाली लागू झाल्यानंतर पोलिसांना दंडाधिकारी अधिकार मिळणार आहेत. पोलिसांना लाठीचार्ज करण्यासाठी आणि कलम 144 लागू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहावी लागणार नाही. मध्य प्रदेशात पोलीस कमिशनर सिस्टम कधीपासून लागू होणार याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

पोलीस कमिशनर सिस्टम काय आहे?

सामान्यत: पोलीस अधिकारी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मोठे निर्णय घेण्यास मोकळे नसतात. त्यांना जिल्हादंडाधिकारी, विभागीय आयुक्त आणि शासनाने दिलेल्या सूचनांच्या आधारे काम करावे लागते. पोलीस आयुक्त प्रणाली लागू झाल्यानंतर पोलिसांचे अधिकार वाढणार आहेत. पोलीस आयुक्त कोणताही निर्णय घेऊ शकतील.

यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पोलिसांना कोणते अधिकार मिळणार?

पोलिसांना मॅजिस्ट्रेटचे अनेक अधिकार मिळतील. दंडाधिकार्‍यांचे अधिकार डीसीपी आणि एसीपी यांना कारवाईसाठी दिले जातील. सरकार शहरातील परिस्थितीनुसार एसपी दर्जाचे डीसीपी तैनात करेल. शस्त्रास्त्रे, उत्पादन शुल्क आणि बांधकाम परवानगीसाठी दिलेली एनओसी पोलीस जारी करू शकतील. याशिवाय परिसरात कलम 144 लागू करणे, लाठीचार्ज करणे, धरणे-निदर्शने-रॅलींना परवानगी देण्याचे अधिकारही पोलिसांना असतील.

पोलीस आयुक्त यंत्रणा कुठे कुठे लागू आहे?

देशातील अनेक राज्यांमध्ये पोलीस आयुक्त प्रणाली लागू आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, ओडिशा आणि राजस्थानचा समावेश आहे. शहरांबद्दल बोलायचे झाले तर, देशातील 71 शहरांमध्ये ही प्रणाली आधीच अस्तित्वात आहे. मध्य प्रदेशात लागू होणारी पोलीस आयुक्त यंत्रणा इतर महानगरांसारखीच असेल की त्यात काही बदल होतील, हे ती लागू झाल्यानंतरच कळेल.

पोलीस आयुक्त यंत्रणा लागू करण्याची वेळ का आली?

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणतात की भोपाळ आणि इंदूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या वाढत आहे. शहरांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस आयुक्त यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (What exactly is the police commissioner system which impliment in Bhopal and Indore)

इतर बातम्या

रुद्राक्षाचे हे लाभ तुम्हाला माहितीयेत का? जाणून घ्या त्याचे चमत्कारिक फायदे

UP Elections 2022: योगींनी शेअर केले मोदींसोबतचे फोटो, कोणत्या विषयावर चर्चा? चर्चांना उधाण

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.