Space ISS Medical Emergency : अंतराळात ॲस्ट्रॉनॉटची तब्येत बिघडल्यास काय करतात ? कसे होतात उपचार ?

Space ISS Medical Emergency : अंतराळवीर काही ना काही संशोधनासाठी अवकाशात जातात. पण जर एखादा अंतराळवीर तिथे आजारी पडला तर काय केलं जातं, उपचार कसे होतात ? तिथे काही औषधे उपलब्ध असतात का?

Space ISS Medical Emergency : अंतराळात ॲस्ट्रॉनॉटची तब्येत बिघडल्यास काय करतात ? कसे होतात उपचार  ?
अंतराळात अंतराळवीरांची तब्येत बिघडल्यास कसे होतात उपचार ?
Image Credit source: social media
| Updated on: Jun 27, 2025 | 11:56 AM

अंतराळातील वातावरण पृथ्वीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. एखादा अंतराळवीर स्पेसमध्ये जाते, तिथून परत आल्यानंतर अंतराळवीरांची हाडं आणि स्नायू कमकुवत होतात. तसेच स्पेसमधून पृथ्वीवर परतल्यानतंर अंतराळवीरांना गंभीर आजार होण्याचा धोका देखील असतो. पण जर एखादा अंतराळवीर अर्थात ॲस्ट्रॉनॉट हा अंतराळात आजारी पडला तर काय होतं ? खरं तर, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात एक वैद्यकीय किट असतोच. त्यात उलट्या, ताप, वेदनाशामक औषधे, बीपी आणि शुगर चेक करण्याची मशिन्स आणि पर्यायी औषधे यासारख्या प्राथमिक काळजीच्या (First Aid) सर्व गोष्टी असतात. एखादी छोटी जखम झाल्यास ते साफ करण्याची औषधं आणि अँटी बायोटिक्सदेखील असतात.

क्रू मेंबर्सना मिळतं बेसिक ट्रेनिंग

त्याचप्रमाणे अंतराळात जाणाऱ्या प्रत्येक क्रू मेंबरला सीपीआरसारखे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. जर स्पेसमध्ये गरज पडली तर ते त्यांच्या सहकाऱ्यांना मदत करू शकतील, हा त्यामागचा हेतू असतो. टीममध्ये अशीदेखील एक व्यक्ती असते जी स्पेसमधील एकप्रकारचा मेडिकल ऑफीसर म्हणजेच वैद्यकीय अधिकारीही असतो. त्या व्यक्तीला इतर लोकांपेक्षा जास्त ट्रेनिंग दिलं जातं आणि अगदी खूप मोठी इमर्जन्सी सिच्युएशन आली तर ती व्यक्ती त्या समस्येचा सामना करू शकते.
याशिवाय, स्पेसमध्ये असलेल्या अंतरावीरांवर पृथ्वीवरून लक्ष ठेवले जाते आणि तिथे उपस्थित डॉक्टरांची टीम त्यांना मार्गदर्शन करत असते.

पृथ्वीवर परत पाठवलं जातं का ?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही आजारी किंवा कमकुवत व्यक्तीला अंतराळात पाठवले जात नाही. फक्त वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त ( medically fit) असलेले लोकच स्पेसमध्ये जाऊ शकतात. म्हणूनच ते कोणत्याही किरकोळ समस्येला सहजपणे सामोरे जाऊ शकतात. पण तरीही, एखाद्या व्यक्तीची तब्येत जर स्पेसमध्ये बिघडलीच तर अंतराळ वैद्यकीय पथक ताबडतोब त्याची काळजी घेते. पण तरीही जर परिस्थिती सुधारली नाही आणि जीवाला धोका निर्माण झाला तर आकस्मिक परतीची (कॉन्टिन्जेंसी रिटर्न ) योजना आखली जाते. अंतराळ स्थानकावर नेहमीच एक लाईफबोट स्पेसक्राफ्ट डॉक केलेले असते. आपत्कालीन परिस्थितीत, अंतराळवीरांना या मार्गाने परत पाठवता येते.