AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातला सगळाच बर्फ वितळला तर? भारतातली ही राज्ये बुडून जणार, जगामध्ये…

समुद्रातील सर्वच बर्फ वितळला तर काय होईल, असे विचारले जाते. आता याचेच उत्तर समोर आले आहे. समुद्रातला बर्फ वितळल्यास भारतापुढे मोठे संकट उभे राहू शकते.

जगातला सगळाच बर्फ वितळला तर? भारतातली ही राज्ये बुडून जणार, जगामध्ये...
ice on earth
| Updated on: Nov 09, 2025 | 5:05 PM
Share

पृथ्वीवर जेवढी जमीन आहे, त्यापेक्षा जास्त पाणी आहे. समुद्रात महाकाय असे हीमनग आहेत. त्यामुळेच समुद्रातील सर्व बर्फ वितळला तर नेमकं काय होणार? असं नेहमीच विचारलं जातं.वैज्ञानिकांच्या मतानुसार समुद्रातील बर्फ पूर्णपणे वितळला तर अनेक शहरं, देश पाण्यात बुडून जातील, असे म्हटले जाते. दरम्यान, समुद्रातील बर्फ वितळल्यावर भारतातील कोणते राज्य अगोदर पाण्याखाली जाणार? तसेच भारतातील कोणते राज्य सर्वाधिक प्रभावित होणार? हे जाणून घेऊ यात…

पृथ्वीवरचा सर्व बर्फ वितळला तर काय होईल?

पृथ्वीवर असलेल्या हिमनद्या, हीमनग आणि ध्रुवीय बर्फ पूर्णपणे वितळल्यावर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. ही पाणीपातळी साधारण 70 मीटर म्हणजेच 230 फुटांनी वाढलेली दिसेल. वैज्ञानिकांच्या मतानुसार पृथ्वीवरील संपूर्ण बर्फ वितळायला शेकडो वर्षे लागू शकतात. परंतू सध्याचा हवामानबदल लक्षात घेता बर्फ वितळण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पृथ्वीवरील समुद्रात असलेला बर्फ वितळायला लागला तर जगाचा नकाशाच बदलून जाईल. अनेक देश थेट पाण्याखाली जातील, असे संशोधकांचे मत आहे.

भारतातील कोणती राज्ये पाण्याखाली जाणार?

पृथ्वीवरील सर्वच बर्फ वितळला तर भारताचा नकाशाच बदलू शकतो. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ यासारखी मोठा समुद्रकिनारा लाभलेली राज्ये थेट पाण्याखाली जाऊ शकतात. यात कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणन, कोच, कटक यासारखी शहरेही पाण्याखाली जाऊ शकतात. गुजरातचे कच्छ क्षेत्रदेखील समुद्राच्या पाण्यात बुडून जाऊ शकते.

कोणकोणते देश थेट पाण्यात बुडून जाणार?

समुद्रातील सर्वच बर्फ वितळून गेल्यावर फक्त भारतावरच नव्हे तर जगातील इतरही काही देशांवर मोठा परिणाम होऊ शकते. यातील न्यूयॉर्क, फ्लोरिडा, अॅमस्टरडॅम, सॅन फ्रान्सिस्को, शांघाय यासरखी शहरे बुडून जातील. तरमालदीव, फिजी, श्रीलंका यांचे तर अस्तित्वच संपून जाईल. सध्या प्रदूषणाचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. ग्लोबल वॉर्निंगमुळे तर समुद्रावरील बर्फ वितळण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर भविष्यात समुद्रातील बर्फ वितळण्याची गती वाढू शकते. त्यामुळे आताच योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा जग धोक्याच्या उंबरठ्यावर असून लवकरच त्याचा अंत होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?