भारताचे कोणते राज्य जेथे सर्वात शेवटी सुर्यास्त होतो ? पाहा कोणते राज्य

भारतीय उपखंड विशाल असल्याने विविधतेने नटलेला आहे. भारतातील काही भागात दिवस आधी सुरु होतो. तर कुठे सर्वात उशीरा रात्र सुरु होते. तर कुठे उन्हामुळे प्रचंड काहीली होत असते तर कुठे थंडीने हुडहुडी भरलेली असते. अशात देशातील कोणता असा भाग आहे जेथे सर्वात शेवटी सुर्यास्त होतो ?

भारताचे कोणते राज्य जेथे सर्वात शेवटी सुर्यास्त होतो ? पाहा कोणते राज्य
suns setImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 6:21 PM

भारत देश विविधतेने नटलेला आहे. या देशात अनेक धर्म आणि जातीचे लोक आपल्या अस्मिता जपत राहात आले आहेत. भारतात अनेक प्रकारचे हवामान पाहायला मिळते. जंगले, नदी, समुद्र किनारे आणि वाळवंट तसेच बर्फाळ प्रदेशही भारतात आहेत. भारतातील प्रत्येक प्रांतातील लोकांची भाषा, आहार आणि रहाणीमानाची पद्धत वेगळी आहे. तरीही आपले देशवासियांना एका राष्ट्रभावनेने एकत्र आहेत. भौगोलिक दृष्ट्या देखील भारत देश विविधतेने नटलेला आहे. भारतातील काही राज्यात सुर्याचा उदय आणि अस्त वेगवेगळ्या वेळी होत असतो. भारतात सर्वात आधी सुर्योदय कोणत्या राज्यात होतो आणि सर्वात शेवटी सुर्यास्त कोणत्या राज्यात होतो याची माहीती देखील आश्चर्यकारक आहे.

देशातील अनेक भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असते. तर काही ठिकाणी त्याच वेळी चक्क ऊन्हं पडलेली असतात. काही भागातील नागरिक उष्णतेने त्रस्त असतात तेव्हा काही भागात थंडी पडलेली असते. काही भागात सर्वात आधी सुर्योदय होतो. तर देशातील काही भागात सुर्यास्त सर्वात शेवटी होतो. अशा प्रकारे विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील अनेक तथ्य आश्चर्यकारक आहेत. सर्वात आधी सुर्योदय कुठे होतो असा प्रश्न विचारला असता तुम्हाला बहुतेकांना माहीती असेल की अरुणाचल प्रदेशात सर्वात आधी सुर्योदय होतो.

येथे सुर्य महाराज लवकर दर्शन देतात

अरुणाचल प्रदेश या शब्दाचा अर्थ पाहायला गेले तर ‘अरुण’ म्हणजे सुर्य, ‘चल’ म्हणजे उगवणे, म्हणजेच असे राज्य जेथे सुर्योदय सर्वात आधी होतो. अरुणाचल प्रदेशातील डोंग व्हॅलीतील देवांग खोऱ्यात एक अशी जागा आहे जिथे दिवस आणि रात्रीची वेळ अन्य राज्यातील वेळेपेक्षा वेगळी आहे. येथे दिवस सकाळी 5 वाजता सुर्योदय होऊन सुरु होतो. तर जुन महिन्यात सकाळी 4.30 वाजताच सुर्य उगवतो. परंतू देशातील कोणता असा प्रदेश आहे जेथे सुर्यास्त सर्वात शेवटी होतो ?

येथे सर्वात शेवटी रात्र होते

भारतातील गुजरात राज्यातील गुहार मोती या भागात सर्वात शेवटी सुर्यास्त होतो. असे यासाठी होते की गुजरात देशाच्या पश्चिम बाजूला आहे. शिवाय हे गाव शेवटचा बिंदू आहे. येथे जून महिन्यात चक्क सायंकाळी 7.39 वाजता सुर्यास्त होतो. यावेळेत देशात सर्वत्र गुडुप अंधार पडलेला असतो. असेच पूर्वेला अरुणाचल प्रदेश आहे. जेथे सर्वात आधी सुर्योदय होतो. परंतू गुजरात पश्चिम बाजूला आहे. जेथे सुर्योदय सर्वात उशीरा होतो त्यामुळे सुर्यास्त देखील सर्वात उशीरा होतो.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.