
व्हाइट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या सत्तेचं केंद्र आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. पण या ऐतिहासिक इमारतीत अनेक सिक्रेट सुरुंग आहेत. आणीबाणीच्या किंवा संकटाच्या काळात राष्ट्रपती आणि त्यांचं कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे सुरुंग तयार करण्यात आलं आहे. आपण आज या सुरुंगाबाबतचीच माहिती घेणार आहोत. या सुरुंगाची अनोखी डिझाईन आणि त्याच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेणार आहोत. तसेच हा सुरुंग कसे सिक्रेट आहे, याची माहितीही जाणून घेणार आहोत. येत्या 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकेत प्रत्येक निवडणुकीत निवडून आलेला नवीन राष्ट्रपती याच तारखेला शपथ घेत असतो. डोनाल्ड ट्रम्पही याच दिवशी व्हाइट हाऊसला येतील आणि आगामी चार वर्ष या व्हाइट हाऊसमध्ये राहतील. या व्हाइट हाऊसमध्ये जगातील प्रत्येक गोष्ट आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींना कन्फर्ट आणि सुरक्षित ठेवणाऱ्या या वस्तू आहेत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तर व्हाइट हाऊसला अभेद्य किल्ला मानलं...