Milk Pouch: दुधाचे पाकिट का असते रंगीत? निळे, हिरवे, नारंगी रंगाचा का होतो वापर? कोणते दूध तुमच्यासाठी योग्य?

Milk Pouch Colour: सकाळी शहरात दुधवाला येत नाही, तर दुकानावर अथवा वितरण केंद्रावरून दुधाच्या पिशव्या आणणे हा चाकरमान्यांचा रोजचा शिरस्ता आहे. पण दुधाचे पाकिट निळे, हिरवे आणि नारंगी रंगाचे का असते? कोणते दूध तुमच्यासाठी आहे योग्य?

Milk Pouch: दुधाचे पाकिट का असते रंगीत? निळे, हिरवे, नारंगी रंगाचा का होतो वापर? कोणते दूध तुमच्यासाठी योग्य?
निळे, हिरवे आणि नारंगी रंगाचे दूधाचे पॅकेट
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 05, 2026 | 4:28 PM

Which Milk Packet is Best: रोज सकाळी अथवा संध्याकाळी दूध आणण्याचा अनेकांचा शिरस्ता असतो. दुकानावर दूध खरेदीला गेल्यावर विविध रंगाच्या पॅकेटात का देण्यात येते. दुधाचे पाकिट हे निळ्या, हिरव्या आण नारंगी रंगाचे का असते? तुम्हाला वाटतं असेल की ही पॅकेजिंग स्ट्रॅटर्जी असेल. पाकिट जितके आकर्षित, तितके पाऊच छान दिसते आणि विक्री होते असा समज असेल तर तो आताच दूर करा. कारण या रंगांच्या पाकिटामागे काही गणितं आहेत.

काय म्हणते दुधाचे विविधरंगी पॅकेट ?

भारतात जे दूध पॅकेट आहे, त्यावर जो रंग दिसतो, ते केवळ डिझाईन नाही, तर एक शॉर्टकट कोड आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) पॅकेजिंगवर अत्यावश्यक माहिती जसे दुधाची गुणवत्ता, परवाना क्रमांक याची माहिती देणे आवश्यक आहे. पण रंगाची निवड डेअरी कंपन्या स्वतः करतात.

या रंगाचा अर्थ आहे तरी काय?

निळा (Blue): टोंड दूध (जवळपास 3 टक्के फॅट)

हिरवा (Green): गुणवत्तापूर्ण दूध (जवळपास 4.5 टक्के फॅट)

नारंगी (Orange): फुल क्रीम दूध (जवळपास 6 टक्के फॅट)

मॅजेंटा (Magenta): डबल टोण्ड दूध (जवळपास 1.5 टक्के फॅट)

याचा अर्थ त्या त्या रंगावरून त्या दुधात किती फॅट आहे आणि किती साय निघू शकते याची माहिती थेट मिळते. जर तुम्हाला साधं दूध हवं असेल तर निळा आणि जास्त मलाईदार दूध हवं असेल तर नारंगी रंगाचं पॅकेट निवडणे आवश्यक आहे.

का करतात रंगाचा वापर?

दूध उत्पादक कंपन्या रोजच्या ग्राहकांना दुधाची खरेदी सहज करता यावी यासाठी रंगाचा वापर करतात. पॅकेजिंग आकर्षक आणि डिझाईन सोप्पी असेल आणि त्या त्या रंगानुसार कोणत्या गुणवत्तेचे दूध मिळणार हे ग्राहकांना कळले की, ते त्या रंगानुसार दुधाचे पॅकेट खरेदी करतील. रंगामुळे त्यांचा कोणताही घोळ होणार नाही. तर रंगानुसार घरी कोणते दूध आज न्यायचे हे त्यांना ठरवाता येईल, त्यासाठी ही रंगाची शक्कल लढवण्यात आली आहे.

Follow Us