
महिलांना पुरुषांपेक्षा जास्त रडायला येत असते. पुरुष देखील रडत असतात, परंतू पुरुषांना रडताना पाहून विचित्र वाटते. महिलांच्या अश्रूंनी तर अनेक लढाया झालेल्या आहेत. रामायणापासून महाभारतापर्यंत याचे दाखले आहेत. परंतू एक गोष्ट मात्र खरी आहे की महिलांच्या डोळ्यांतील अश्रू लागलीच गालावर ओघळतात. त्यामुळे महिलांना काही झाले की रडायला पटकन कसे येते या मागचे सायन्स नेमके काय आहे हे पाहूयात…
पुरुष आणि महिलांचे हार्मोन्स आणि रडण्यामागच्या कारणांचा छडा लावण्यासाठी साल २०११ मध्ये एक संशोधन झाले. या संशोधनातून एक अशा प्रकारची माहिती उघडकीस आली ती वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल…या संशोधनानुसार एक महिला संपूर्ण वर्षभर ३० ते ६४ किंवा यापेक्षा जास्त वेळा रडते. तसेच महिला या सार्वजनिक स्थळी देखील रडू शकतात. तर पुरुष संपूर्ण वर्षभरात पाच ते सात वेळा रडतात. परंतु पुरुष हे सर्वसामान्यपणे एकांतात रडतात.
रडण्यासाठी शरीरातील हार्मोन्स जबाबदार असतात. संशोधनानुसार पुरुषांमध्ये अशा प्रकारचे हार्मोन्स आहे जे त्यांना महिलांच्या तुलनेत अधिक शक्तीशाली आणि मजबूत बनवते. या हार्मोन्सचे नाव टेस्टोस्टेरोन ( Testosterone ) आहे. हेच हार्मोन्स पुरुषांत कमी किंवा जास्त बनने हे त्याच्या लैगिंक गतिविधींना संचालित करते. हे हार्मोन्स पुरुषांना रडणे किंवा भावनिक होण्यापासून रोखते. हे इमोशनल इंटेलिजन्सचे काम करते आणि अश्रूंना वाहण्यापासून रोखते.
हॉलंडच्या प्रोफेसरनी केलेल्या संशोधनानंतर पुरुषांना कमी रडण्यास जबाबदार असलेल्या हार्मोन्सला प्रोलेक्टन हार्मोन्स ( prolactin ) असे मानले जात आहे. वास्तविक प्रोलेक्टन हॉर्मोन मनु्ष्याला भावूक बनवते आणि त्यांच्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. पुरुषांच्या शरीरात हे प्रोलेक्टन हॉर्मोन अत्यंत कमी असते. तर महिलांच्या शरीरात याचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे हे हार्मोन्स जास्त प्रमाणात असल्याने महिलांना जास्त भावनिक असतात आणि जास्त रडतात देखील. तर पुरुषांना त्यांचे मर्द असल्याचे दाखविणे भाग असल्याने ते रडत नाहीत किंवा फारच कमी वेळा रडतात