एलपीजीपासून अधूनमधून दुर्गंध का येतो? जाणून घ्या यामागील नेमके कारण

तुम्ही तुमच्या घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीचे चांगलेच निरीक्षण केले असेल, तर तुम्हाला कळेल की अधूनमधून एलपीजीच्या सिलिंडरमधून दुर्गंध येत असतो. (Why is there an occasional odor from LPG, know the exact reason behind this)

एलपीजीपासून अधूनमधून दुर्गंध का येतो? जाणून घ्या यामागील नेमके कारण
एलपीजी गॅस
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 8:54 PM

नवी दिल्ली : आजच्या घडीला देशातील मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या स्वयंपाकचा गॅस अर्थात एलपीजीचा वापर करीत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही आता घराघरात एलपीजी पोहोचला आहे. यापूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक घरात चुली पेटायच्या. चुलीवर जेवण बनवले जायचे. त्यामुळे चुलीमधील जळत्या लाकडांचा मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडायचा. परिणामी घरातदेखील घुसमट व्हायची. आता चुलींच्या जागी एलपीजीचा सिलिंडर उभा राहिल्यामुळे घरातील वातावरण चांगले राहू लागले आहे. चुलीच्या धुरापासून होणारी घुसमट थांबली आहे. अर्थात एलपीजी आपणा सर्वांचे जीवन सुखकर बनवले आहे. एलपीजी जेवढा सोईस्कर आहे, तितकाच धोकादायकही आहे. या धोक्यांची आपल्याला कल्पना असली पाहिजे, जेणेकरून आपण संबंधित धोके टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊ शकतो. एलपीजी अनेकदा आपल्या घरातील मालमत्तांचेही प्रचंड नुकसान करू शकतो. (Why is there an occasional odor from LPG, know the exact reason behind this)

एलपीजीला मधेच दुर्गंध येतो कुठून?

तुम्ही तुमच्या घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीचे चांगलेच निरीक्षण केले असेल, तर तुम्हाला कळेल की अधूनमधून एलपीजीच्या सिलिंडरमधून दुर्गंध येत असतो. तुम्हाला यामागील कारण माहित आहे का? एलपीजी तर पूर्णपणे गंधहीन असतो अर्थात त्याला कुठलाही वास येत नसतो. मग दुर्गंध येतो कोठून? तर यामागे मोठे कारण आहे. हे कारण तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. आपण सगळेच हे जाणतो की स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस अत्यंत ज्वलनशील गॅस असतो. हा गॅस आपल्या घरात मोठे नुकसानही पोहोचवू शकतो.

लिकेज कळण्यासाठी गॅसमध्ये मिसळले जाते केमिकल कंपाऊंड

स्वयंपाकाच्या गॅसपासून होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उत्पादनाच्या वेळीच गॅसमध्ये ‘मिरकाप्टन’ नावाचे खास केमिकल कंपाऊंड मिसळले जाते. गॅसमध्ये मिसळल्या जाणार्या याच केमिकल कंपाऊंडमुळे स्वयंपाक घरात उच्च क्षमतेचा दुर्गंध येत असतो. याच दुर्गंधांमुळे आपल्याला स्वयंपाकाचा गॅस लिंक झाला आहे, हे कळते. त्यामुळे आपण वेळीच सुरक्षेचे उपाय करून संभाव्य मोठ्या प्रमाणावरील नुकसान टाळतो. जर गॅसमध्ये ‘मिरकाप्टन’ नावाचे खास केमिकल कंपाऊंड मिसळले गेले नाही, तर आपल्याला गॅस लिकेज झाल्याचे कळणारही नाही. त्यामुळे गॅस गळती होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. (Why is there an occasional odor from LPG, know the exact reason behind this)

इतर बातम्या

45 वर्षावरील दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य, ठाणे पालिकेचा मोठा निर्णय

भारतातील कंडोम वापराचं प्रमाण कमी का? पहिल्याच ‘Condomology’ अहवालात धक्कादायक खुलासे

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.