500 रुपयांची नोट खरंच बंद होणार का? काय आहेत कारणे?

तज्ज्ञांच्या मते, मार्च 2026 पर्यंत 500 रुपयांच्या नोटा बंद होऊ शकतात. आता यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

500 रुपयांची नोट खरंच बंद होणार का? काय आहेत कारणे?
500 Rupees
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 02, 2025 | 4:53 PM

गेल्या काही दिवसांपासून 500 रुपयांच्या नोटा बंद होण्याच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 2,000 रुपयांच्या नोटांप्रमाणे 500 रुपयांच्या नोटा देखील चलनातून बंद करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरी नियामक बँकेकडून 500 रुपयांच्या नोटांबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नसले, तरी तज्ज्ञांच्या मते, मार्च 2026 पर्यंत 500 रुपयांच्या नोटा बंद होऊ शकतात. चला, यामागील 3 प्रमुख कारणांबद्दल जाणून घेऊया.

बँकिंग तज्ज्ञ अश्विनी राणा यांनी सांगितले की, आरबीआय मार्च 2026 पर्यंत 500 रुपयांच्या नोटा बंद करू शकते. त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितले की, आरबीआय नोटबंदीप्रमाणे या नोटा एकदम बंद करण्याचा निर्णय घेणार नाही. त्याऐवजी, प्रथम या नोटांचे चलन थांबवून बाजारातील त्यांची संख्या कमी करण्यावर काम करेल. यासाठी बँकेकडून 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचे चलन वाढवले जाऊ शकते. बँकांमधील एटीएममध्ये या नोटांची संख्या वाढवली जाईल आणि 500 रुपयांच्या नोटा हळूहळू बाजारातून काढून बँकांमध्ये जमा केल्या जातील. ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होणारी नाही. आरबीआयची योजना यासाठी लागू केली जाऊ शकते. मार्च 2026 पर्यंत याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

वाचा: घटस्फोटीत मैत्रिणीकडूनच निलेश चव्हाणचा गेम, ती टेक्नॉलॉजीही फेल; पोलिसांना नेपाळचं लोकेशन कसं मिळालं?

ही आहेत कारणे

आरबीआयने 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला तर त्या यामागील कारण काय आहे? नियामक बँक 500 रुपयांच्या मोठ्या नोटा बंद करण्याचा विचार का करत आहे?

काळ्या पैशावर नियंत्रण

सरकार काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी 500 रुपयांच्या नोटा बंद करू शकते. देशभरात असे दिसून आले आहे की, जेव्हा कधी आयकर विभागाच्या छापेमारी होतात, तेव्हा जप्त होणाऱ्या नोटांच्या गठ्ठ्यांमध्ये प्रामुख्याने 500 रुपयांच्या नोटा असतात. सरकार आणि आरबीआय या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याची योजना आखत आहेत. काळा पैसा बँकांमध्ये जमा करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

लहान नोटांना प्रोत्साहन

आरबीआय लहान नोटांना प्रोत्साहन देईल. 500 रुपयांच्या नोटांचे चलन कमी करून एटीएम आणि बँकांमध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचे चलन वाढवले जाईल. जितक्या मूल्याच्या 500 रुपयांच्या नोटा बंद होतील, तितक्याच मूल्याच्या लहान नोटांची छपाई केली जाईल.

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन

सरकार डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठीही मोठ्या नोटांवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. डिजिटल पेमेंटचा अवलंब केल्याने काळ्या पैशाची ओळख पटणे शक्य होईल. त्याचबरोबर लोकांच्या सोयींमध्येही वाढ होईल.