AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी 5 कोटी किंमत असलेल्या गोलंदाजाला होणार अटक?

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी अवघ्या तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना आरसीबीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण संघाच्या स्टार गोलंदाजावर अटकेची टांगती तलवार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर कधीही अटक होऊ शकते.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी 5 कोटी किंमत असलेल्या गोलंदाजाला होणार अटक?
IPL 2026 स्पर्धेपूर्वी 5 कोटी किंमत असलेल्या गोलंदाजाला होणार अटक?Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 24, 2025 | 8:41 PM
Share

भारताचा उदयोन्मुख आणि आरसीबीचा डावखुरा गोलंदाज यश दयाल याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. स्पर्धेला तीन महिन्यांचा अवधी शिल्लक असताना अटक झाली तर स्पर्धेत भाग घेणं कठीण होणार आहे. जयपूरच्या पॉक्सो कोर्टाने 24 डिसेंबर 2025 रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगित अत्याचाराचा त्याच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. जयपूर मेट्रोपॉलिटन फर्स्टच्या पोस्को कोर्ट क्रमांक 3च्या न्यायाधीश अलका बंसल यांनी हा निकाल देताना स्पष्टपणे सांगितलं की, उपलब्ध पुरावे आणि आतापर्यंतच्या तपासात आरोपीला खोट्या गुन्ह्यात गोवलं जात असल्याचं कुठे दिसत नाही. उलट तपासात आरोपीची भूमिका दिसून आली आहे. अजूनही चौकशी बाकी आहे. असं नाही की आता यश दयालला तुरुंगात जावं लागेल. त्याच्याकडे हायकोर्टात जाण्याचा मार्ग आहे. दुसरीकडे, या प्रकरणात अडकलेला यश दयाल क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.

जुलै 2025 मध्ये गुन्ह्याची नोंद

जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्यात 23 जुलै 2025 रोजी गुन्हा दाखल झाला होता. 19 वर्षीय तरुणीने यश दयाल विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली होती. तक्रारकर्तीने दावा केला की, क्रिकेटपटूसोबत 2023 मध्ये ओळख झाली होती. तेव्हा ती 17 वर्षांची होती आणि अल्पवयीन होती. यशने क्रिकेटमध्ये करिअर घडविण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या शोषण केलं होतं. 2023मध्ये यशने जयपूरच्या सितापूर भागात असलेल्या एका हॉटेमध्ये बोलवून पहिल्यांदा अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. पीडित तरूणीच्या मते, पुढे दोन वर्षे असंच घडलं.

आरसीबीने केलं आयपीएल 2026 साठी रिटेन

आरसीबीने 17 वर्षानंतर 18 व्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं. गतविजेच्या आरसीबी संघाचा यश दयाल भाग होता. 2026 आयपीएल स्पर्धेसाठी आरसीबीने त्याच्यावर विश्वास टाकला आहे. त्याला रिटेन करत संघात ठेवलं आहे. आरसीबीने 2024 मध्ये त्याला पहिल्यांदा संघात घेतलं होतं. तेव्हा 5 कोटी त्याच्यासाठी मोजले होते. तेव्हापासून यश दयाल आरसीबीचा भाग आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.