नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात माशांच्या जाळ्यात अडकून 18 पक्षांचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात मंगळवारी सायंकाळी बेकायदेशीर मासेमारीकरिता टाकलेल्या जाळ्यात सुमारे 17 ते 18 पक्षी अडकून त्यांचा मृत्यू झाला. नांदूर मधमेश्वरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर भगवान ठाकरे व अधिकारी अशोक काळे यांनी घटनास्थळी जाऊन मासेमारीची जाळी बाहेर काढत मृत पक्षी काढले. या पक्षांचा पंचनामा करण्यात आला असून अज्ञात मासेमारी करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा […]

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात माशांच्या जाळ्यात अडकून 18 पक्षांचा मृत्यू
Follow us on

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात मंगळवारी सायंकाळी बेकायदेशीर मासेमारीकरिता टाकलेल्या जाळ्यात सुमारे 17 ते 18 पक्षी अडकून त्यांचा मृत्यू झाला. नांदूर मधमेश्वरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर भगवान ठाकरे व अधिकारी अशोक काळे यांनी घटनास्थळी जाऊन मासेमारीची जाळी बाहेर काढत मृत पक्षी काढले. या पक्षांचा पंचनामा करण्यात आला असून अज्ञात मासेमारी करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या मांजरगाव परिसरात अज्ञात मासेमारी करणार्‍या लोकांनी सुमारे पाच मासेमारी करिता लागणारे जाळे टाकण्यात आले होते. यामध्ये सुमारे 17 ते 18 पक्षी अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या पक्षांमध्ये कॉमन क्रेन 1, कॉमन कुट 2, डार्टर 2, ग्रेटर कॉरमोनंट 3, लिटल कॉरमोनंट एक आणि डक 1 असे एकूण 18 पक्षांचा मृत्यू झाला आहे. नांदूर मधमेश्वर धरण क्षेत्रामध्ये हे पक्षी अभयारण्य येत असल्याने या ठिकाणी मासेमारी करण्यास परवानगी नसतानाही अनधिकृतपणे मासेमारी केली जात असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.

महाराष्ट्रातील एक उत्तम तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो, त्याप्रमाणे नांदूर मधमेश्वर हे ‘पक्षीतीर्थ’ आहे. या अभयारण्यात करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणातून येथे 240 हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहेत. येथील जलाशयात 24 जातीचे मासे आहेत. परिसरात 400 हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे. या परिसरात उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटे, विविध प्रकारचे साप दिसून येतात. अभयारण्यात पक्षी सुची तयार करण्यात आली आहे आणि दरवर्षी पक्षी गणनेनंतर ती सुधारित अपडेट केली जाते. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी अधिवासाची संपन्नता तसेच दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्त्व लक्षात घेऊन हे क्षेत्र ‘भारतीय पक्षीतीर्थ जाळ्या’त समाविष्ट करण्यात आले आहे.

फ्लेमिंगो, टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शॉवलर, पिनटेल, क्रेन, गारगनी, टर्नस्, गज, पेलिकन, गॉडविट, सॅन्ड पायपर, क्रेक, कर्ल्यु, हॅरियर, प्रॅटिनकोल, गल इत्यादी स्थलातंरित पाणपक्षी येथे जास्त प्रमाणात आढळून येतात. पाण कोंबडी, मुग्ध बलाक, गायबगळे, मध्य बगळे, खंड्या, आयबीस, स्टॉर्क इत्याही स्थानिक पक्षी येथे सातत्याने दिसतात. तर पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर, कुट आदी स्थानिक स्थलांतरित पक्षीही येथे आढळून येत असतात. मात्र अवैधरीत्या होणाऱ्या मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यामुळे या पक्ष्यांचा जीव धोक्यात आले आहे .