कोल्हापूरमध्ये भीषण अपघात, दोन वर्षीय बाळाचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : सांगली-कोल्हापूर मार्गावर आज (19 मे) सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एका 2 वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात कोल्हापूर येथील हातकणंगले गावाजवळ घडला. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगली-कोल्हापूर मार्गावर आज (19 मे) सकाळी 7 च्या सुमारास सीमेंटचा […]

कोल्हापूरमध्ये भीषण अपघात, दोन वर्षीय बाळाचा जागीच मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

कोल्हापूर : सांगली-कोल्हापूर मार्गावर आज (19 मे) सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एका 2 वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात कोल्हापूर येथील हातकणंगले गावाजवळ घडला. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सांगली-कोल्हापूर मार्गावर आज (19 मे) सकाळी 7 च्या सुमारास सीमेंटचा ट्रक आणि जीपमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जण जखमी झाले आहेत, तर दोन वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण नवविवाहित जोडप्याला घेऊन ज्योतिबा दर्शनासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. अपघातात जखमी झालेले सर्वजण कर्नाटकच्या बागलकोट येथील रहिवासी आहेत.

या अपघातात चौघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. काल (18 मे) रात्रीही याच ठिकाणी ट्रक आणि टू व्हीलर धडकून दोन युवक गंभीर जखमी झाले होते. त्याशिवाय आतापर्यंत याठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातामध्ये 12 ते 13 जण गंभीर जखमी झाले आहेत.