Battle Of Galwan : सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चा टीझर चीनला चांगलाच झोंबला, नुसत्या एका टीझरने चीन अस्वस्थ, अपप्रचाराला सुरुवात
Battle Of Galwan : बॅटल ऑफ गलवानचा टीझर रिलीज झाल्यानंतर त्यावर चीनची प्रतिक्रिया आली आहे. 2020 साली गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यावर हा चित्रपट आधारित आहे. नुसता टीझर रिलीज झाल्यानंतर चीन किती अस्वस्थ झालाय ते दिसू लागलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट बॅटल ऑफ गलवानचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटामुळे चीनला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर चीनची चिंता वाढली आहे. या चित्रपटाची कथा 2020 मध्ये गलवान क्षेत्रात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षावर आधारित आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्सने या चित्रपटावर टीका केली आहे. यात फॅक्ट्स नाहीत असा ग्लोबल टाइम्सचा दावा आहे. आमच्या पवित्र भूमीवर या चित्रपटाने काही परिणाम होणार नाही असं चिनी एक्सपर्ट्सनी म्हटलं आहे. सलमान खानला चीनमध्ये बहुतांश लोक बजरंगी भाईजान चित्रपटासाठी ओळखतात, असं ग्लोबल टाइम्सने म्हटलं आहे. चित्रपट बॅटल ऑफ गलवानमध्ये सलमान खान कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे. सलमान साकारत असलेल्या पात्राने 2020 ला गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात महत्वाची भूमिका बजावली होती.
बॅटल ऑफ गलवानचा टीझर रिलीज झाल्यानंतर त्यावर चीनची प्रतिक्रिया आली आहे. चित्रपटातील फॅक्ट्सवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एका चिनी एक्सपर्टनी म्हटलय की, “बॉलिवूडचे बहुतांश चित्रपट हे भावना आणि मनोरंजनावर आधारित असतात. वाढवून-चढवून बनवलेला चित्रपट इतिहास बदलू शकत नाही तसचं चिनी सैनिकांचा आपल्या भागाचं संरक्षण करण्याचा इरादाही यामुळे कमकुवत होणार नाही” या चित्रपटावरुन चीनमध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. सोशल मीडियावर युजर्स कमेंट करत आहेत. चिनी वेबसाइट वीबोवर एका युजरने लिहिलय की, ‘ओव्हरड्रामॅटिक भारतीय चित्रपट तथ्याशी मेळ खाणारा नाहीय’
चीनचे किती सैनिक मारले गेलेले?
चीनचा असा दावा आहे की, 15 जून 2020 रोजी भारतीय सैनिकांनी कराराच उल्लंघन करुन LAC पार केली. चर्चेसाठी आलेल्या चिनी सैनिकांवर हल्ला केला. त्यानंतर हिंसक झडप झाली. दोन्ही बाजूला जिवीतहानी झाली. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्र द क्लैक्शननुसार, गलवान खोऱ्यात चीनचे 38 सैनिक मारले गेले. पण चीन म्हणतो की, त्यांचे फक्त चार सैनिक मारले गेले आणि भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते.
चिनी सैन्य एक्सपर्टच म्हणणं काय?
चिनी सैन्य एक्सपर्ट सोंग झोंगपिंग यांच्यानुसार, “भारतात चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रवादी भावना भडकावणं अजिबात नवीन नाहीय. चित्रपटातून तुम्ही सत्य बदलू शकत नाही. गलवानच्या घटनेत भारताने सीमापार केली आणि चिनी सैन्याने आपल्या क्षेत्राचं संरक्षण केलं”
