लातूर जिल्हा कोरोनामुक्त, आठही प्रवासी रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

| Updated on: Apr 19, 2020 | 4:06 PM

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं (corona patient recover in latur) आहे.

लातूर जिल्हा कोरोनामुक्त, आठही प्रवासी रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
Follow us on

लातूर : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं (corona patient recover in latur) आहे. याचदरम्यान लातूरमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लातूरमध्ये उपचार घेत असलेले आठही प्रवासी रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत त्यांना निलंगा इथल्या क्वारंटाईन हॉस्टेलमध्ये (corona patient recover in latur) ठेवण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर त्यांना त्यांच्या मूळगावी आंध्रप्रदेश मधल्या कर्नुल जिल्ह्यात पाठवण्यात येईल. हरियाणातून-दिल्ली मार्गे हे लोक कर्नुलकडे निघाले होते. दरम्यान निलंगा येथून त्यांना ताब्यात घेऊन प्रशासनाने तपासणी केली असता 12 पैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झाले होते. आता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

या रुग्णांची काळजी घेण्यासाठी लातूरच्या विलासराव देशमुख आरोग्य विज्ञान संस्थेत स्वतंत्र इमारतीत कक्ष उभारण्यात आला होता. 14 दिवसांच्या उपचारानंतर सुरुवातीला तीन निगेटिव्ह आले तर काल उर्वरित पाच जनांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. लातूरमध्ये आठ पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने लातूर शहरासह लातूर जिल्ह्यातले लोक तणावाखाली वावरत होते. आता त्यांना दिलासा मिळाला असला तरी कोरोनासंबंधी काळजी ही घ्यावीच लागणार आहे.

लातूर जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने लोकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे . आरोग्य विभागातील कर्मचारी आणि डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. तातडीने पालकमंत्री अमित देशमुख यांनी सोशल मीडियात माहिती देत लातूर रेड झोनमधून थेट ग्रीन मध्ये आल्याची माहिती दिली, यासाठी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.