अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनकडून मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यामध्ये भारतला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनेही पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने बुधवारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करा, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र परिषदेत करण्यात आला आहे. यामुळे हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे. दरम्यान, या प्रस्तावाला चीनकडून […]

अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनकडून मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यामध्ये भारतला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनेही पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने बुधवारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करा, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र परिषदेत करण्यात आला आहे. यामुळे हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे.

दरम्यान, या प्रस्तावाला चीनकडून विरोध केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी सुरक्षा परिषदेत इस्लामिक स्टेट, अलकायदा आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद अजहरवर प्रतिबंध करण्यासाठी चीनने विरोध केला होता. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनच्या प्रस्तावावर चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीकडे मसूद अजहरची संपत्ती जप्त करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.

भारताने 2009 साली संयुक्त राष्ट्र परिषदेत मसूद अजहरच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. यानंतर भारताने 2016 आणि 2017 मध्ये मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषीत करण्यासाठीचा प्रस्ताव दिला होता. मात्र प्रत्येकवेळी चीन यामध्ये विरोध करत होता. नुकतेच फ्रान्सने मसूद अजहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करावा यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय केला होता. या संदर्भात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत चर्चाही केली होती.

फ्रान्ससोबत अमेरिकेनेही या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अजित डोभाल यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी या प्रस्तावाला समर्थन करतो असे सांगितले. बुधवारी यूएनमध्ये प्रस्ताव मांडण्यात आला. आता सर्वांचे लक्ष चीनवर लागून राहिले आहे. दरम्यान दहशतवाद विरोधातील कारवाईत चीनचा पाठिंबा मिळावा यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आहे.

व्हिडीओ : पाकिस्तानकांड…! पाकिस्तानच्या नापाक कुरापती ! गोळीबाराचं भारताकडून चोख प्रत्युत्तर