AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खानकडून ‘लक्ष्मी बॉम्ब’चं कौतुक, भावुक झालेला अक्षय कुमार म्हणतो…

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानने या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

आमिर खानकडून 'लक्ष्मी बॉम्ब'चं कौतुक, भावुक झालेला अक्षय कुमार म्हणतो...
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 15, 2020 | 11:17 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi Bomb) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकची खूप प्रशंसा होत आहे. अक्षयच्या प्रशंसकांमध्ये आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची भर पडली आहे. (Aamir Khan appreciated Laxmi Bomb trailer, Akshay Kumar became emotional)

आमिर खानने लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर ट्विटरवर शेअर करत अक्षय कुमारचं कौतुक केलं आहे. आमिरने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, प्रिय अक्षय कुमार, लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर शानदार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित व्हायला हवा होता. या चित्रपटातला तुझा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. तुमच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा!

आमिर खानने शुभेच्छा दिल्यानंतर अक्षयने आमिरचं ट्विट रिट्विट केलं. यावेळी अक्षयने भावुक प्रतिक्रिया दिली. अक्षयने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, प्रिय आमिर खान, तुझ्या या शब्दांनी मला अधिक प्रोत्साहन दिलं आहे. या अवघड समयी तुझे हे शब्द माझ्यासाठी खूप मोठे आहेत. माझ्या मित्रा तुझ्या या शब्दांनी माझ्या मनाला स्पर्श केला आहे.

अक्षय कुमारनंतर लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाची नायिका कियारा अडवाणी हिनेदेखील आमिरचे आभार मानले आहेत. कियाराने लिहिलं आहे की, आमिर खान आमच्या चित्रपटासाठी तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे खूप आभार.

‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi bomb) चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमारने (Akshay kumar) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. ‘जिथे कुठे असला तिथेच थांबा, आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यासाठी तयार व्हा. कारण आता लक्ष्मी बरसणार आहे,’ असे कॅप्शन देत त्याने या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला.

‘लक्ष्मी बॉम्ब’ची कथा काय?

भूतांवर विश्वास नसणार हा नायक, भारतात त्याच्या होणाऱ्या सासऱ्यांना भेटायला आला आहे. इथे लोकांची भूतांवर असणारी श्रद्धा पाहून तो त्यांना आव्हान देतो. ‘प्रत्यक्षात भूतं नसतात आणि असतील तर मला दिसतील. आणि तेव्हा मी हातात बांगड्या घालेन’, अशी घोषणा नायक करतो. यादरम्यान तो नायिकेच्या कुटुंबासोबत राहत असतो. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी त्याच्यात काही बदल घडायला लागत. अचानक तो महिलांप्रमाणे वागायला लागतो. त्यामुळे घाबरलेल घरचे अनेक उपाय करतात, असे या ट्रेलरमध्ये दिसते आहे.

कियारा अडवाणी-अक्षय कुमारची जोडी!

‘गुडन्यूज’नंतर अक्षय आणि कियारा अडवाणी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणी नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नृत्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. पोस्टरवरून जरी हा चित्रपट गंभीर वाटत असला, तरी प्रत्यक्षात ट्रेलरमध्ये चित्रपटाची विनोदी झलक पाहायला मिळाली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चा धमाका होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 9 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असला तरी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार निर्माते करत आहेत. राघव लॉरेन्स यांनी या धमाकेदार हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे

संबंधित बातम्या

Laxmmi Bomb Trailer | ‘बॉयकॉट’चा धसका, ‘लक्ष्मी बॉम्ब’ ट्रेलरमध्ये लाईक-डिसलाईक बटण गायब!

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा धुमाकूळ, 24 तासात 7 कोटी व्ह्यूज

(Aamir Khan appreciated Laxmi Bomb trailer, Akshay Kumar became emotional)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?