अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा धुमाकूळ, 24 तासात 7 कोटी व्ह्यूज

अभिनेता तुषार कपूरने पोस्ट शेअर करत या ट्रेलरला 70 मिलियनपेक्षा जास्त व्हूज मिळाल्याची माहिती दिली.

अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'च्या ट्रेलरचा धुमाकूळ, 24 तासात 7 कोटी व्ह्यूज
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 11:37 PM

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा लवकरच (Film Laxmmi Bomb Trailer Made Record) प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर 9 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या 24 तासात 70 मिलियन म्हणजेच 7 कोटीपेक्षा जास्त लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे (Film Laxmmi Bomb Trailer Made Record).

अभिनेता तुषार कपूरने पोस्ट शेअर करत या ट्रेलरला 70 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्याची माहिती दिली. लक्ष्मी बॉम्बच्या ट्रेलरला इतकं प्रेम दिल्याबाबत धन्यवाद आणि याला भारतात 24 तासात सर्वात जास्त बघितला जाणारा ट्रेलर बनवण्यासाठीही, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं.

या चित्रपटाचा ट्रेलर काल 9 ऑक्टोबरला सोशल मीडियावरुन प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षय कुमारने (Akshay Kumar) या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित केल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकची प्रशंसा झाली होती.

अक्षय कुमारने (Akshay kumar) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. ‘जिथे कुठे असला तिथेच थांबा, आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यासाठी तयार व्हा. कारण आता लक्ष्मी बरसणार आहे,’ असे कॅप्शन देत त्याने या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

भूतांवर विश्वास नसणार हा नायक, भारतात त्याच्या होणाऱ्या सासऱ्यांना भेटायला आला आहे. इथे लोकांची भूतांवर असणारी श्रद्धा पाहून तो त्यांना आव्हान देतो. ‘प्रत्यक्षात भूतं नसतात आणि असतील तर मला दिसतील. आणि तेव्हा मी हातात बांगड्या घालेन’, अशी घोषणा नायक करतो. यादरम्यान तो नायिकेच्या कुटुंबासोबत राहत असतो. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी त्याच्यात काही बदल घडायला लागत. अचानक तो महिलांप्रमाणे वागायला लागतो. त्यामुळे घाबरलेल घरचे अनेक उपाय करतात, असे या ट्रेलरमध्ये दिसते आहे. (Film Laxmmi Bomb Trailer Made Record)

कियारा अडवाणी-अक्षय कुमारची जोडी!

‘गुडन्यूज’नंतर अक्षय आणि कियारा अडवाणी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणी नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नृत्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. पोस्टरवरून जरी हा चित्रपट गंभीर वाटत असला, तरी प्रत्यक्षात ट्रेलरमध्ये चित्रपटाची विनोदी झलक पाहायला मिळाली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चा धमाका होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 9 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असला तरी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार निर्माते करत आहेत. राघव लॉरेन्स यांनी या धमाकेदार हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे (Film Laxmmi Bomb Trailer Made Record)

संबंधित बातम्या :

Laxmmi Bomb Trailer | ‘बॉयकॉट’चा धसका, ‘लक्ष्मी बॉम्ब’ ट्रेलरमध्ये लाईक-डिसलाईक बटण गायब!

Laxmmi Bomb Trailer | ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा जोरदार धमाका, अक्षय कुमारचा नवा ‘क्वीन’ अंदाज!

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.