Baba Ka Dhaba | मटर पनीर खाण्यासाठी अपारशक्ती खुरानाची ‘बाबा का ढाबा’ला भेट!

| Updated on: Oct 21, 2020 | 12:42 PM

अभिनेत्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात 'बाबा का ढाबा'च्या बाहेर उभा असल्याचे दिसत आहे.

Baba Ka Dhaba | मटर पनीर खाण्यासाठी अपारशक्ती खुरानाची ‘बाबा का ढाबा’ला भेट!
Follow us on

मुंबई : काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ती रडतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. लॉकडाऊन काळात उदरनिर्वाहासाठी चालवत असलेले छोटेखानी हॉटेल बंद पडल्याने, या 80 वर्षीय वृद्ध दाम्पत्याचा आक्रोश सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात पोहोचला. यानंतर ‘बाबा का ढाबा’वर लोकांची अक्षरशः रीघ लागली होती. बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुरानालादेखील (Aparshakti Khurana) ‘बाबा का ढाबा’ला (Baba Ka Dhaba) जाण्याचा मोह आवरता आला नाहीय. (Actor Aparshakti khurana visits Baba Ka Dhaba After video gets viral)

अभिनेत्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘बाबा का ढाबा’च्या बाहेर उभा असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अपारशक्ती म्हणतो, ‘मी गौरव वासनला वचन दिले होते की, जेव्हा दिल्लीला येईन तेव्हा बाबा का ढाब्यावर जाऊन काहीतरी नक्की खाईन. आज अखेर मी तिथे आलो आहे.’ एवढेच नव्हे तर, त्याने इथे मिळणारे मटर पनीर आतापर्यंत चाखलेले सर्वोत्कृष्ट मटर पनीर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे लिहिले की, ‘गौरव तू आमच्या सर्वांचा अभिमान आहेस. तू बाबांसाठी जे केलेस, त्यातून ‘व्होकल फॉर लोकल’ कसे व्हावे ते शिकता येण्यासारखे आहे.’

‘आपल्यासारखे बरेच लोक येथे येतात आणि सेल्फी घेतात. पण, मुकुल आणि तुशांत नावाची दोन मुले बाबांच्या मदतीला रोज येतात. देशात असे बरेच लोक आहेत, जर आपण त्यांना मदत केली तर, त्यांच्या आयुष्यात बरेच बदल घडून येतील’, असे अपारशक्तीने म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे. (Actor Aparshakti khurana visits Baba Ka Dhaba After video gets viral)

‘बाबा का ढाबा’ सोशल मीडियामुळे चर्चेत!

दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये हा ढाबा आहे. कांता प्रसाद हे वृद्ध गृहस्थ आपल्या पत्नीसह हा ढाबा चालवतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लोक पूर्वीसारखे ढाब्यावर येत नसल्याने कांता प्रसाद यांच्यासमोर दैनंदिन गुजराण कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता.

एका व्यक्तीने कांता प्रसाद यांची विचारपूस केली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर एका युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत कांता प्रसाद यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटीजनी हा व्हिडिओ रिट्विट करत कांता प्रसाद यांना मदत करण्याची विनंती केली होती. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघानेही हा व्हिडीओ रिट्विट केला होता.

त्यामुळे साहजिकच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे आता कांता प्रसाद यांच्या ‘बाबा का ढाबा’वर चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी दिल्लीकरांची रीघ लागल्याचे चित्र आहे. याशिवाय, अनेकजण कांता प्रसाद यांना आर्थिक मदत करण्यासाठीही पुढे सरसावले आहेत. या प्रतिसादामुळे कांता प्रसाद प्रचंड भारावून गेले. संपूर्ण देश माझ्यासोबत आहे, असे मला आज वाटत आहे. प्रत्येकजण मला मदत करत असल्याची भावना कांता प्रसाद यांनी व्यक्त केली.

(Actor Aparshakti khurana visits Baba Ka Dhaba After video gets viral)