Sushant Singh Rajput Funeral | सुशांतसिंह राजपूत अनंतात विलीन, तुफान पावसात वडिलांकडून मुखाग्नी

| Updated on: Jun 15, 2020 | 6:01 PM

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर विले पार्लेतील पवन हंस स्मशानभूमीत संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. (Sushant Singh Rajput Funeral)

Sushant Singh Rajput Funeral | सुशांतसिंह राजपूत अनंतात विलीन, तुफान पावसात वडिलांकडून मुखाग्नी
Follow us on

Sushant Singh Rajput Funeral मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत अनंतात विलीन झाला. सुशांतच्या पार्थिवावर विले पार्लेतील पवन हंस स्मशानभूमीत संध्याकाळी पावणेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे वडील, बहीण, तिचा पती, मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि काही जवळचे नातेवाईक, मित्र उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात वडिलांकडून त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. कूपर रुग्णालयापासून सुरु झालेल्या त्याच्या अखेरच्या प्रवासात वरुणराजानेही हजेरी लावली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, अभिनेते विवेक ओबेरॉय, रणवीर शौरी यासारखे मोजके कलाकार वगळता मोठ्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली नाही.

सुशांत सिंह राजपूतचं पार्थिव दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कूपर रुग्णालयातून पवन हंस स्मशानभूमीत नेण्यात आलं. यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

सुशांत सिंह राजपूतचे पार्थिव पुन्हा एकदा पाटण्याला नेण्याबाबत कुटुंबाने मागितलेली परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे सुशांतचे वडील लेकाला अखेरचा निरोप देण्यासाठी बिहारहून आज दुपारी मुंबईत दाखल झाले. सुशांतचे कुटुंबिय आधी त्याच्या वांद्र्यातील निवासस्थानी गेले होते, तिथून ते पवन हंस स्मशानभूमीत गेले. सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने कूपर रुग्णालयात जाऊन त्याचे अखेरचे दर्शन घेतले.

सुशांतच्या घरी फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती. वांद्रे पोलीसही घटनास्थळी गेले. त्यांनी घरातील बारीक-सारीक वस्तूची बारकाईने तपासणी केली.

धक्कादायक एक्झिट

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीयच नाही, तर बॉलिवूड, क्रीडा विश्व आणि त्याचे चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्याने सर्वजण हादरुन गेले आहेत.

सुशांतने काल (रविवार 14 जून) वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचे शवविच्छेदन काल रात्री करण्यात आले. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. जेजे रुग्णालयात उत्तरीय तपासणीत त्याच्या शरीरात ड्रग्ज किंवा विष नसल्याचे स्पष्ट झाले.

पाहा व्हिडिओ :

सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

नेमकं काय झालं?

सुशांत वांद्र्यातील ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्याच्यासोबत स्वयंपाकी आणि दोन नोकर होते. सुशांत नेहमीप्रमाणे ज्यूस घेऊन वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. जेवणाबाबत विचारणा करण्यासाठी नोकर गेले असता, उत्तर आले नाही. त्यामुळे तो झोपला असेल, असे समजून नोकर पुन्हा खाली गेले. काही वेळाने गेल्यानंतरही उत्तर न आल्याने सर्व जण घाबरले.

सुशांतची बहीण गोरेगावमध्ये राहते. सुशांत दार उघडत नसल्याचे नोकरांकडून समजल्यावर ती 40 मिनिटात त्याच्या वांद्र्यातील घरी पोहोचली. आवाज देऊन आणि फोन करुनही उत्तर न मिळाल्याने त्यांनी चावीवाल्याला बोलावले. परंतु लॉक न उघडल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा सुशांत पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. दुपारी 3.30 वाजता त्याला कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा : सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेला धक्का, दुसऱ्या क्षणी फोन ठेवला

हिरव्या रंगाच्या कुर्त्याने गळफास लावून सुशांतने फाशी घेतल्याची प्राथामिक माहिती आहे. गेले 5 ते 6 महिने मुंबईत तो मनोचिकित्सकाकडून नैराश्यावर उपचार करत असल्याचं म्हटलं जातं, मात्र उपचाराबाबत कोणतेही कागदपत्र मिळालेले नाहीत. सुशांतला कोणतीही आर्थिक अडचण नव्हती, अशी पोलिसांची माहिती आहे.

सुशांत सिंह राजपूतचा फोन पोलिसांच्या ताब्यात असून आदल्या रात्री त्याने मित्र महेश शेट्टीला फोन केला होता. त्याआधी बहिणीसोबतही त्याची फोनवरुन बातचीत झाली होती. (Sushant Singh Rajput Funeral)

सुशांतचा प्रवास

स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.

पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.

2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले.

एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Sushant Singh Rajput | मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध, सुशांतसिंह राजपूतच्या नोकराचा दावा

Sushant Singh Rajput Suicide : आभासी आवाजही ऐकू यायचे, घाबरलेली मैत्रीण निघून गेली, सुशांतसोबत काय काय घडलं?

Sushant Singh Rajput Chhichhore | शेवटच्या सिनेमात आत्महत्या न करण्याचा मंत्र, आठ महिन्यांनी स्वत:चं जीवन संपवलं

Sushant Singh Rajput | अंधुक भूतकाळ अश्रूवाटे ओघळतोय, आईच्या आठवणीतील सुशांतची अखेरची पोस्ट

Sushant Singh Rajput | आधी संतोष लाल, आता सुशांत, सात वर्षात दोन मित्र गमावले, धोनीला शब्द फुटेनात

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

Sushant Singh Rajput | गळ्यावर दोरीचा व्रण, सुसाईड नोट नाही, सुशांतच्या आत्महत्येचं प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितलं!

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

Sushant Singh Rajput suicide | मैत्रिणीसोबत नव्या फ्लॅटचा शोध, सहकाऱ्याने फोन न उचलणे, दाटून आलेलं नैराश्य ते गळफास

(Sushant Singh Rajput Funeral)