Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
Sushant Singh Rajput suicide

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूड हादरलं आहे. (Sushant Singh Rajput Dhoni) केवळ बॉलिवूडच नाही सर्व क्षेत्र हादरुन गेलं आहे.

सचिन पाटील

|

Jun 14, 2020 | 3:59 PM

Sushant Singh Rajput suicide मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूड हादरलं आहे. (Sushant Singh Rajput Dhoni) केवळ बॉलिवूडच नाही तर कला, सांस्कृतिक, राजकारण, शिक्षण असं सर्व क्षेत्र हादरुन गेलं आहे. विशेषत: क्रीडा क्षेत्रातूनही सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन सुशांत सिंह राजपूतने स्वत:चं जीवन संपवलं.

सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  अवघ्या काही काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजरनेही आत्महत्या केली होती. (Sushant Singh Rajput Dhoni)

सुशांत सिंह राजपूतने काय पो छे, शुद्ध देसी रोमान्स, पी के, छिछोरे यासारख्या सिनेमांनी शाबासकीची थाप मिळवली. पण धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमाने त्याने यशाचं टोक गाठलं. सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका साकारुन मैदानावरचा धोनी रुपेरी पडद्यावर उभा केला. या सिनेमाने त्याला मोठी दाद मिळवून दिली.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांना धक्का बसला आहे. याबाबत धोनीची प्रतिक्रिया काय असेल, धोनी हे दु:ख पचवू शकेल का याबाबतचीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. सिनेमाच्या निमित्ताने सुशांत आणि धोनी एकमेकांचे चांगले मित्र बनले होते.

धोनीची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र धोनी गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियापासून दूर असल्याचं दिसतंय. धोनीने शेवटचं ट्विट 14 फेब्रुवारीला केलं होतं, त्यानंतर त्यांने कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर केलेली नाही.

सिनेमाची 200 कोटीची कमाई

धोनी जसा मैदानावर गाजला, तसा तो रुपेरी पडद्यावरही गाजला. सुशांत सिंह राजपूत पडद्यावर धोनीसारखा वावरला. त्यामुळेच हा सिनेमा चाहत्यांनीही डोक्यावर घेतला. या सिनेमाने 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली.

सुशांत सिंह राजपूतची कारकीर्द

जन्म – २१ जानेवारी १९८६

स्टार प्लसच्या किस देश में है मेरा दिल मालिकेतून पदार्पण

२००९ मध्ये आलेल्या पवित्र रिश्ता मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळाली.

२०१ ३ मध्ये सिनेविश्वात पदार्पण

काय पो छे पहिला हिंदी चित्रपट, सिनेमातील अभिनयासाठी फिल्मफेयरसाठी नामांकन

२०१६ मध्ये एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी चित्रपट तुफान गाजला

चित्रपट

 • काय पो छे
 • शुद्ध देसी रोमान्स
 • पी के
 • डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी
 • एम एस धोनी – द अनटोल्ड स्टोरी
 • राबता
 • वेलकम टू न्यूयॉर्क
 • केदारनाथ
 • सोन चीरिया
 • शेवटचा थिएटरमध्ये रिलीज झालेला – छिछोरे
 • ड्राईव्ह नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ड्राईव्ह

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?   

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें