Sushant Singh Rajput Last Rites Live | सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन

सुशांतने काल (रविवार 14 जून) वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. (Actor Sushant Singh Rajput last rites)

 • Updated On - 5:15 pm, Mon, 15 June 20 Edited By: SachinP
Sushant Singh Rajput Last Rites Live | सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन
Sushan Singh Rajput


Sushant Singh Rajput last rites मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीयच नाही, तर बॉलिवूड, क्रीडा विश्व आणि त्याचे चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्याने सर्वजण हादरुन गेले आहेत. कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विले पार्ले येथील पवन हंस येथील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडले. (Actor Sushant Singh Rajput last rites)

सुशांतचे वडील आज दुपारी बिहारहून मुंबईत दाखल झाले.  सुशांतने काल (रविवार 14 जून) वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचे शवविच्छेदन काल रात्री करण्यात आले. त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टही आले असून गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. जेजे रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन त्याच्या शरीरात ड्रग्ज किंवा विष होते का, याची माहिती मिळेल.

Live Update

 • सुशांत सिंह राजपूतचं पार्थिव पवन हंस स्मशानभूमीत दाखल, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी
 • सुशांत सिंह राजपूतचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर आणलं, अॅम्ब्युलन्स स्मशानभूमीकडे रवाना, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार
 • सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबिय वांद्र्यातील घरातून स्मशानभूमीकडे रवाना, वडील, बहीण पवन हंस स्मशानभूमीकडे
 • सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार
 • सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार
 • सुशांत सिंह राजपूतच्या घरी फॉरेन्सिक टीम दाखल, वांद्रे पोलीसही घटनास्थळी, घरातील बारीक-सारीक वस्तूची बारकाईने तपासणी
 • बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून सुशांत सिंहला श्रद्धांजली, सुशांत तू तुझं आयुष्य का संपवलंस? सोशल मीडियावरुन बिग बींचा सवाल, आम्हाला न विचारता, न सांगता का गेलास, सुशांतचं बोलणं तोलूनमापून होतं, सुशांतचं असणं सुद्धा तोलूनमापूनच, बिग बींची प्रतिक्रिया
 • मुंबईच्या जूहू पवन हंस इथे सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराची अद्याप कोणतीच तयारी नाही,  मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर अंत्यसंस्कार कोणत्या स्मशानभूमीत करण्याबाबत निर्णय होणार
 • सुशांतच्या पार्थिवावर मुंबईत दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार होणार, विलेपार्लेमधील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यविधी 
 • कूपर रुग्णालयातील डॉक्टरांकडून मुंबई पोलिसांना पोस्टमार्टेम रिपोर्ट सुपूर्द, तिघा डॉक्टरांच्या पथकाकडून ऑटोप्सी, गळफास घेतल्याने श्वास कोंडल्याचे अहवालात नमूद 
 • सुशांतच्या पार्थिवावर वर्सोवा किंवा पार्ल्यात अंत्यसंस्कार करण्याबाबत कुटुंबीय निर्णय घेणार, पार्थिव पुन्हा एकदा पाटण्याला नेण्याबाबत कुटुंबाने मागितलेली परवानगी नाकारण्यात आली

सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. सुशांतच्या पश्चात वडील आणि बहिणी असा परिवार आहे.

नेमकं काय झालं?

सुशांत वांद्र्यातील ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्याच्यासोबत स्वयंपाकी आणि दोन नोकर होते. सुशांत नेहमीप्रमाणे ज्यूस घेऊन वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. जेवणाबाबत विचारणा करण्यासाठी नोकर गेले असता, उत्तर आले नाही. त्यामुळे तो झोपला असेल, असे समजून नोकर पुन्हा खाली गेले. काही वेळाने गेल्यानंतरही उत्तर न आल्याने सर्व जण घाबरले.

सुशांतची बहीण गोरेगावमध्ये राहते. सुशांत दार उघडत नसल्याचे नोकरांकडून समजल्यावर ती 40 मिनिटात त्याच्या वांद्र्यातील घरी पोहोचली. आवाज देऊन आणि फोन करुनही उत्तर न मिळाल्याने त्यांनी चावीवाल्याला बोलावले. परंतु लॉक न उघडल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा सुशांत पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. दुपारी 3.30 वाजता त्याला कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा : सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेला धक्का, दुसऱ्या क्षणी फोन ठेवला

हिरव्या रंगाच्या कुर्त्याने गळफास लावून सुशांतने फाशी घेतल्याची प्राथामिक माहिती आहे. गेले 5 ते 6 महिने मुंबईत तो मनोचिकित्सकाकडून नैराश्यावर उपचार करत असल्याचं म्हटलं जातं, मात्र उपचाराबाबत कोणतेही कागदपत्र मिळालेले नाहीत. सुशांतला कोणतीही आर्थिक अडचण नव्हती, अशी पोलिसांची माहिती आहे.

सुशांत सिंह राजपूतचा फोन पोलिसांच्या ताब्यात असून आदल्या रात्री त्याने मित्र महेश शेट्टीला फोन केला होता. त्याआधी बहिणीसोबतही त्याची फोनवरुन बातचीत झाली होती.

सुशांतचा प्रवास

स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.

पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.

2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले.

एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Sushant Singh Rajput Chhichhore | शेवटच्या सिनेमात आत्महत्या न करण्याचा मंत्र, आठ महिन्यांनी स्वत:चं जीवन संपवलं

Sushant Singh Rajput | अंधुक भूतकाळ अश्रूवाटे ओघळतोय, आईच्या आठवणीतील सुशांतची अखेरची पोस्ट

Sushant Singh Rajput | आधी संतोष लाल, आता सुशांत, सात वर्षात दोन मित्र गमावले, धोनीला शब्द फुटेनात

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

Sushant Singh Rajput | गळ्यावर दोरीचा व्रण, सुसाईड नोट नाही, सुशांतच्या आत्महत्येचं प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितलं!

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

Sushant Singh Rajput suicide | मैत्रिणीसोबत नव्या फ्लॅटचा शोध, सहकाऱ्याने फोन न उचलणे, दाटून आलेलं नैराश्य ते गळफास

(Actor Sushant Singh Rajput last rites)