Sushant Singh Rajput suicide LIVE UPDATE | सुशांतचा फोन पोलिसांच्या ताब्यात, पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. आज रात्री सुशांतचं पार्थिव कुपर हॉस्पिटलमध्येच ठेवलं जाणार आहे. Sushant Singh Rajput suicide LIVE UPDATE

Sushant Singh Rajput suicide LIVE UPDATE | सुशांतचा फोन पोलिसांच्या ताब्यात, पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 7:39 PM

Sushant Singh Rajput suicide मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. वांद्र्याच्या राहत्या घरी गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्याने सर्वजण हादरुन गेले आहेत. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.

सुशांतचं कुटुंब मुंबईत आज रात्री 12 पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आज रात्री सुशांतचं पार्थिव कुपर हॉस्पिटलमध्येच ठेवलं जाणार आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. फोटोतही त्याच्या गळावरील व्रण दिसत आहेत. त्याच्या आसपासच्या लोकांची , मित्रांची पोलिसांनी चौकशी केली, प्राथमिक चौकशीत तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. मानसिक तणाव हे कारण समोर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट अद्याप पोलिसांना सापडलेली नाही.

Sushant Singh Rajput suicide LIVE UPDATE

  • हिरव्या रंगाचा कुर्ताने गळफास लावून फाशी घेतल्याची प्राथामिक माहिती, 5 ते 6 महिने मुंबईत मनोचिकित्सकाकडून नैराश्यातून उपचार करत असल्याची माहिती, उपचाराबाबत कोणतेही कागदपत्र मिळाले नाही. सुशांतला कोणतीही आर्थिक अडचण नव्हती – पोलिसांची माहिती
  • सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार, सुशांतचं कुटुंब मुंबईत 12 पर्यंत पोहोचणार, आज रात्री सुशांतचं पार्थिव कुपर हॉस्पिटलमध्येच ठेवणार
  • सुशांत सिंह राजपूतचा फोन पोलिसांच्या ताब्यात, सुशांतचा काल रात्री महेश शेट्टीला फोन, त्याआधी बहिणीसोबतही फोनवरुन बातचीत
  • सुशांत सिंह राजपूत यांच्यावर गेल्या सहा महिन्यापासून मानसोपचारतज्ञांकडून उपचार सुरु होते.
  • सुशांतच्या पार्थिवाचं शवविच्छेदन झाल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवणार
  • सुशात सिंह राजपूतचं पार्थिव राहत्या घरातून रवाना.  कुपर रुग्णालयाचा दिशेने पोलियांचा ताफा रवाना
  • सुशांतच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी
  • सुशांतच्या निधनाने बॉलिवूडला हादरा

टीव्ही मालिकेतून करिअरला सुरुवात

सुशात सिंह राजपूतने आतापर्यंत अनेक टीव्ही सिरिअल आणि चित्रपटात काम केले आहे. सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल ‘किस देश मे हा मेरा दिल’ मधून झाली. यानंतर त्याला खरी लोकप्रियता दिग्दर्शक एकता कपूर यांची सिरिअल ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. यानंतर सुशांतने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.

सुशांतची आत्महत्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. फोटोतही त्याच्या गळावरील व्रण दिसत आहेत. त्याच्या आसपासच्या लोकांची , मित्रांची पोलिसांनी चौकशी केली, प्राथमिक चौकशीत तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. मानसिक तणाव हे कारण समोर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट अद्याप पोलिसांना सापडलेली नाही.

सुशांतने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नेमका का केली? त्याला नेमकं कोणत्या गोष्टीची चिंता होती? त्याला नैराश्य आलं होतं का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारले जात आहेत. सुशांतने मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने बॉलिवूड हादरुन गेलं आहे.

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या  

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?   

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.