अभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करीमी (Mandana karimi) नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. नुकतेच मंदानाने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये मंदानाने हॉट आणि बोल्ड अशा पोज दिल्या आहेत.

अभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 10:24 AM

मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल मंदना करीमी (Mandana karimi) नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. नुकतेच मंदनाने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये मंदनाने हॉट आणि बोल्ड अशा पोज दिल्या आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. फोटोतील तिच्या हॉट आणि हटके अशा पोेजमुळे तिच्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

याआधीही मंदनाने (Mandana karimi) आपल्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरसह इतर सोशल मीडिया माध्यमांवर आपले  हॉट फोटो अपलोड केले होते. मंदनाचे हॉट व्हिडीओही युट्यूबवर आहेत. मंदना नेहमीच सोशल मीडियावर हटके असे फोटो पोस्ट करत असते.

मंदनाने एफएचएम नावाच्या मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे. यामध्ये तिने एकापेक्षा एक अशा हटके पोज दिल्या आहेत. हे फोटो तिच्या अनेक चाहत्यांना घायाळ करत आहेत.

दरम्यान, बिग बॉस सीझन 9 कार्यक्रमातून मंदना घराघरात पोहचली. तिने आतापर्यंत भाग जॉनी, क्या कुल है हम 3 या चित्रपटात काम केलं आहे. मंदना लवकरच एक इराणी चित्रपट ‘कोकाकोला’मध्ये अभिनेत्री सनी लिओनीसोबत दिसणार आहे.