Juhi Chawala | विमानतळावर अडकलेल्या जुही चावलाची सरकारला विनंती, म्हणाली…

| Updated on: Nov 11, 2020 | 5:27 PM

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये जुही विमानतळावरची परिस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे.

Juhi Chawala | विमानतळावर अडकलेल्या जुही चावलाची सरकारला विनंती, म्हणाली...
Follow us on

मुंबई : अभिनेत्री जुही चावलाने (Actress Juhi Chawala) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानतळाच्या वेटिंग विभागात उभी असल्याचे दिसते आहे. जुही जिथे उभी तिथे लोकांची खूप गर्दी जमेलेली होती. विमानतळावर किती गर्दी आहे आणि विमानतळाची व्यवस्था कशी आहे, यावर वैतागलेल्या जुहीने सरक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे (Actress Juhi Chawala Stuck On Airport tweeted a video).

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये जुही विमानतळावरची परिस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत जुहीने साकार आणि विमान प्राधिकरणाकडे अतिरिक्त काउंटर बसवण्याची मागणी केली आहे. विमानांचे प्रवासाला जाणाऱ्या आणि प्रवासाहून आलेल्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणीत विलंब होत असल्याने, वैतागलेल्या प्रवाशांनी या काउंटरवर विचारपूस करण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर ठरवण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग होत होता. अशा वेळी लोकांच्या मदतीसाठी इथे आणखी एका अतिरिक्त काउंटरची व्यवस्था करावी, अशी मागणी जुहीने तिच्या व्हिडीओमधून केली आहे.

जुही चावलाचे ट्विट

विमानताळावरील व्हिडीओ पोस्ट करत जुही म्हणते, ‘प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी त्वरित अतिरिक्त काउंटरची व्यवस्था या ठिकाणी करण्यात यावी, अशी सरकार आणि विमान प्राधिकरणाला विनंती आहे. विमान प्रवासातून आलेले अनेक प्रवाशी गेले अनेक तास इथे अडकून पडले आहेत. विमानांचे उड्डाण सुरूच आहे. प्रवासी येतच आहेत. ही अत्यंत दयनीय आणि वाईट परिस्थिती आहे.’ (Actress Juhi Chawala Stuck On Airport tweeted a video)

कोरोना काळात प्रत्येकजण स्वतःच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत आहे. प्रत्येकाला खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क सर्वात महत्त्वाचे आहेत. सध्या सणासुदीचा हंगामही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत विमानतळ, रेल्वे स्थानक यासारख्या ठिकाणी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

यापूर्वीही जुहीने घरी आलेल्या भाजी-पाल्यावरून ट्विट केले होते. तिच्या घरी आलेल्या भाज्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या होत्या. यावर संतापलेल्या जुहीने ट्विट करत ‘सुशिक्षित लोकांनी पृथ्वीचे सर्वाधिक नुकसान केले’, असे म्हटले होते.

(Actress Juhi Chawala Stuck On Airport tweeted a video)