PHOTO | निवेदिता सराफांची कोरोनावर मात, सासूबाई ‘आसावरी’चे सेटवर जोरदार स्वागत!

| Updated on: Oct 06, 2020 | 1:26 PM

1 / 7
झी मराठीच्या ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेच्या सेटवरही कोरोनाने प्रवेश केला होता.

2 / 7
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली होती.

3 / 7
निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घेण्याचे ठरवले होते.

4 / 7
15 सप्टेंबर रोजी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यादिवसापासून ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते.

5 / 7
त्यांचे सहकलाकार तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, डॉ. गिरीश ओक यांच्यासह इतर कलाकारांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

6 / 7
आता कोरोनावर यशस्वीरित्या मात करून अभिनेत्री निवेदिता सराफ पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत.

7 / 7
कोरोनावर मात करत त्यांनी पुन्हा एकदा मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सासूबाई ‘आसावरी’चे सेटवर जोरदार स्वागत करण्यात आले आहे.