औरंगाबादमध्ये वॉटर ऑपरेटरच्या मुलाचं यूपीएससीत घवघवीत यश, देशात 155 वी रँक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झालाय. कनिष्क कटारिया याने देशातून अव्वल येण्याचा मान मिळवलाय. अक्षत जैन आणि जुनैद अहमद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रातून सृष्टी देशमुख ही पहिली आली असून तिचा देशात पाचवा क्रमांक आहे. शिवाय महिला उमेदवारांमध्येही ती पहिली आली आहे. देशभरातील 759 उमेदवारांमध्ये […]

औरंगाबादमध्ये वॉटर ऑपरेटरच्या मुलाचं यूपीएससीत घवघवीत यश, देशात 155 वी रँक
Follow us on

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झालाय. कनिष्क कटारिया याने देशातून अव्वल येण्याचा मान मिळवलाय. अक्षत जैन आणि जुनैद अहमद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रातून सृष्टी देशमुख ही पहिली आली असून तिचा देशात पाचवा क्रमांक आहे. शिवाय महिला उमेदवारांमध्येही ती पहिली आली आहे.

देशभरातील 759 उमेदवारांमध्ये औरंगाबादमधील आदित्य मिरखेलकरचा 155 वा क्रमांक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत त्याने अभ्यास केला. त्याचे वडील धनंजय मिरखेलकर हे वॉटर ऑपरेटर आहेत. औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनवर चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून ते काम करतात.

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थी

सृष्टी देशमुख – पाचवी

तृप्ती धोडमिसे – 16 वी

वैभव गोंदणे – 25 वा

मनिषा आव्हाळे – 33 वी

हेमंत पाटील – 39 वा

टॉपर विद्यार्थ्यांची यादी

  1. कनिष्क कटारिया
  2. अक्षत जैन
  3. जुनैद अहमद
  4. श्रवण कुमात
  5. सृष्टी जयंत देशमुख
  6. शुभम गुप्ता
  7. कर्नाटी वरूणरेड्डी
  8. वैशाली सिंह
  9. गुंजन द्विवेदी
  10. तन्मय वशिष्ठ शर्मा

यूपीएससीकडून एकूण 759 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. देशात आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी निवडणारी ही सर्वोच्च परीक्षा आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी यावर्षीही बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या निकालातही महाराष्ट्रातील टॉपर विद्यार्थ्यांचा समावेश होता.