AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, काँग्रेसचा बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश…

Shiv Sena UBT vs Congress : छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूकीपूर्वा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला सहकारी पक्ष काँग्रेसचा एक बडा नेता फोडला आहे.

मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, काँग्रेसचा बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश...
Abdul rashid khan join shivsena ubtImage Credit source: X
| Updated on: Dec 19, 2025 | 5:03 PM
Share

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष रणनीती तयार करण्यात व्यस्त आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींनाही सुरवात झाली आहे. उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेले लोक पक्षांतर करत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी नवीन पक्षात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीतील बरेच नेते महायुतीतील पक्षात सामील झाले आहेत. मात्र आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला सहकारी पक्ष काँग्रेसचा एक बडा नेता फोडला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूकीपूर्वा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात सामील झालेला हा नेता कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीत व्यस्त आहेत. अशातच आता उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

ठाकरे गटाची ताकद वाढली

माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणूकीमुळे काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. अब्दुल रशिद खान यांच्यासह असंख्य कार्यकर्तांनी आज मशाल हाती घेतली. यामुळे आगामी निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर एका दिवसाने 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.

सोलापूरमध्येही काँग्रेसला फटका

सोलापूर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. आता याच बालेकिल्ल्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. याचा परिणाम थेट आगामी महानगर पालिकेवर होण्याची शक्यता आहे.

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.