मोत्याच्या दाण्यांसारखं हस्ताक्षर सोशल मीडियावर व्हायरल, तिसरीतील मुलीचे जयंत पाटलांकडून कौतुक

तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरुर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा! अशी पोस्टही जयंत पाटील यांनी ट्विटरवर केली (third std girl good handwriting) आहे. 

मोत्याच्या दाण्यांसारखं हस्ताक्षर सोशल मीडियावर व्हायरल, तिसरीतील मुलीचे जयंत पाटलांकडून कौतुक
| Edited By: | Updated on: Feb 07, 2020 | 7:29 AM

शिर्डी : गेल्या काही दिवसांपासून सुंदर हस्ताक्षर असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत (third std girl good handwriting) आहे. या व्हिडीओला बघता बघता हजारो लाईक्स आणि कमेंट मिळाल्या. हे सुंदर हस्ताक्षर तिसरीत शिकणाऱ्या श्रेया सजन या मुलीचं असून ती राहुरीमधील कडूवस्ती या जिल्हा प्राथमिक शाळेत शिकते. विशेष म्हणजे श्रेयाच्या या अक्षराचे कौतुक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही कौतुक केलं आहे.

राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिसरीच्या इयत्तेत शिकणारी श्रेया सजन हिने जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत हे लिहिलं आहे. शाईच्या पेनाने लिहिलेल्या हे पान सुंदर आणि वळणदार शब्दांनी गुंफल गेलं आहे. यातील एक एक अक्षर हे जणू मोत्यासारखं भासत आहे. यातील प्रत्येक शब्दाची ठेवण ही वेगवेगळी आणि नजरेस भरणारी अशी आहे.

जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत श्रेयाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर श्रेयाच्या वडीलांनी तिचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला. यावर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलं आहे.

तिच्या वडीलांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओचं जयंत पाटील यांनीही कौतुक केलं आहे. जयंत पाटील यांनी तिचे हस्ताक्षर असलेले पान ट्विटरवर पोस्ट केलं आहे.  “प्रिय श्रेया, तुझे खूप खूप अभिनंदन! तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खुप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरुर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा!”, अशी पोस्टही जयंत पाटील यांनी ट्विटरवर केली (third std girl good handwriting) आहे.

श्रेयाचे वडील गोरक्षनाथ सजन हे त्याच शाळेत शिक्षक आहेत. श्रेयाच हस्ताक्षर सुंदर असल्याने पहिलीच्या वर्गापासून त्यांनी तिच्या हस्ताक्षराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अनेकदा तिला स्पर्धेत अपयशही आलं. श्रेयाच्या वडिलांनी कॅलीओग्राफीचा एक व्हिडीओ युटयूबवर बघितला. त्यानंतर श्रेयाला खोडलेल्या निपच्या पेनने हस्ताक्षर गिरवायला सुरुवात केली.

सुरुवातीला श्रेयाला लिहिताना बोटाला त्रास होत होता. तरीही रोज एक पान तिच्यांकडून लिहून घ्यायचो. आता तिच हे यश पाहून खूप आनंदी असल्याची भावना तिच्या आईने व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये आज अमुलाग्र बदल होताना दिसून येतो आहे. आनंदी आणि हसत खेळत शिक्षण मिळत असल्याने जि.प शाळांचा टक्काही वाढू लागला आहे. खासगी शाळेच्या तुलनेत जि.प शाळा कमी नाहीत हे श्रेया सारख्या गुणी विद्यार्थिंनीमुळे सिद्ध होत आहे, असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केला (third std girl good handwriting) आहे.