AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांकडून सत्तेचा गैरवापर, गोपीनाथ मुंडेंवरही लाठी हल्ला : संजय काकडे

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर लाठी हल्ला केल्याचा घणाघाती आरोप भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे.

अजित पवारांकडून सत्तेचा गैरवापर, गोपीनाथ मुंडेंवरही लाठी हल्ला : संजय काकडे
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 15, 2019 | 2:32 PM
Share

पुणे : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर लाठी हल्ला केल्याचा घणाघाती आरोप भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. यापूर्वी अजित पवार यांनी भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना काकडे पुण्यात बोलत होते.

संजय काकडे यांनी अजित पवारांना आपल्या भूतकाळात डोकावण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “अजित पवारांनी सत्तेत असताना सत्तेचा गैरवापर केला. त्यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर सत्तेत असताना आंदोलनादरम्यान लाठी हल्ला केला. मावळमध्येही त्यांनीच शेतकऱ्यांवर गोळीबार केला.”

‘राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक घरं फोडली आहेत’

काकडे यांनी यावेळी भाजपने मात्र सत्तेचा कोणताही दुरुपयोग केला नसल्याचा दावा केला. तसेच  भाजपने कुणावरही कोणताही हल्ला केला नसल्याचे सांगितले. काकडे पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक घरं फोडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर पक्षातील नेत्यांना आयात करुनच वाढला आहे.”

लवकरच भाजपचे अधिकृत सदस्य होणार असल्याची काकडेंची घोषणा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पराभूत होतील असं भाकित संजय काकडे यांनी वर्तवलं होतं. त्यामुळे दानवे काकडेंवर चांगलेच नाराज झाले होते. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी संजय काकडेंवर बोचरी टीका केली होती. संजय काकडे हे पक्षाचे सदस्य नसल्याने काहीही बोलू शकतात. ते कोणताही सर्वे करु शकतात, असं मत रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलं होतं. त्यावर संजय काकडे यांनी आपण लवकरच भाजपचे अधिकृत सदस्य होऊ असं म्हटलं आहे. काकडे म्हणाले, “भाजप देईन ती जबाबदारी स्वीकारेन. मी सहयोगी सदस्य आहे. मात्र, आता लवकरच मी भाजपचा सदस्य होईन.”

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली