Ajoy Mehta | अजोय मेहतांना मुदतवाढ नाही, मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती

| Updated on: Jun 24, 2020 | 10:39 PM

महाविकास आघाडीतील वादानंतर अखेर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळालेली (Ajoy Mehta Will Replace Chief Secretary Sanjay Kumar) नाहीच.

Ajoy Mehta | अजोय मेहतांना मुदतवाढ नाही, मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती
अजोय मेहता
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीतील वादानंतर अखेर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता (Ajoy Mehta) यांना मुदतवाढ मिळालेली नाही. गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार (Sanjay Kumar) यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.  असं असलं तरी ठाकरे सरकारने अजोय मेहता यांच्यावर वेगळी जबाबदारी दिली आहे. अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे. (Sanjay kumar Appointed New Chief Secretary Ajoy Mehta will be Chief Principal Secretary)

विद्यमान मुख्य सचिव असलेले अजोय मेहता हे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. मात्र ठाकरे सरकारमध्ये मेहता यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मे 2019 मध्ये अजोय मेहता यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन थेट राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली होती.

अजोय मेहता यांना यापूर्वी मुदतवाढ मिळाली होती. मात्र आता पुन्हा मुदतवाढ मिळालेली नाही. अजोय मेहता यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या रेसमध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची नावं होती. मात्र संजय कुमार यांच्या नावाला पसंती मिळाली.

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

दरम्यान, अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळाली नसली, तरी त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खास पद दिलं आहे. अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.

सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलं.

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरु करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची, तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील, असं सीएमओने म्हटलं आहे.

अजोय मेहतांवरुन महाविकास आघाडीत कुरबूर

अजोय मेहता यांच्यावरुन महाविकास आघाडीत कुरबूर पाहायला मिळत होती. अजोय मेहता यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध होता. बाळासाहेब थोरात यांनी तर उघड उघड बोलत, अधिकारी सर्वस्वी नाहीत, तर मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवपदाचा निर्णय घेताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विचारात घ्यावं, असं काँग्रेसने म्हटलं होतं.

संजय कुमार मुख्य सचिवपदी

संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

कोण आहेत अजोय मेहता?

  • अजोय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ते कार्यरत होते.
  • अजोय मेहता राज्यात पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव होते.
  • अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत.
  • आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची, तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.

कोण आहेत संजय कुमार?

  • संजय कुमार  हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • संजय कुमार हे अजोय मेहतांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • ते मूळचे बिहारचे असून त्यांना प्रशासकीय सेवेचा दीर्घ अनुभव आहे.
  • संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत.
  • संजय कुमार गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळतात.

(Sanjay kumar Appointed New Chief Secretary Ajoy Mehta will be Chief Principal Secretary)

संबंधित बातम्या :  

राज्याच्या मुख्य सचिवपदी अजॉय मेहता, परदेशींकडे मुंबईच्या चाव्या?