तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार अक्षय कुमार, लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे पोस्टर लाँच

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आपल्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने चित्रपटाचे पहिले पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहे. पोस्टरसह अक्षयने चित्रपटाची तारीखही जाहीर केली आहे. लक्ष्मी बॉम्ब 5 जून 2020 रोजी प्रदर्शित […]

तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार अक्षय कुमार, लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे पोस्टर लाँच
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आपल्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने चित्रपटाचे पहिले पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहे. पोस्टरसह अक्षयने चित्रपटाची तारीखही जाहीर केली आहे. लक्ष्मी बॉम्ब 5 जून 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

अक्षयने पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले आहे की, “Bringing you one bomb of a story, Laxmmi Bomb starring @kiaraaliaadvani & yours truly! Bursting in cinemas on 5th June,2020.”

लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तामिळ चित्रपट कंचनाचा रिमेक आहे. या चित्रपटात अक्षयसोबत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री कायारा आडवाणी असेल. चित्रपटात अक्षय कुमार तृतीयपंथी भूताच्या रुपात दिसणार आहे. तसेच या चित्रपटात बॉलिवूड महानायक अभिनेता अमिताभ बच्चनही तृतीयपंथी भूताच्या भूमिकेत दिसणार आहे, असं सांगितलं जात आहे. अक्षयने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तो डोळ्यात काजळ लावताना दिसत आहे.

“एका स्पेशल रोलसाठी मी अमिताभ बच्चन यांना माझ्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी इच्छुक आहे. पण अक्षय कुमार आणि त्याच्या टीमसोबत बोलून पुढील निर्णय घेण्यात येईल”, असं चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स म्हणाले.

अभिनेत्री कायरा अडवाणीनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. या पोस्टरसोबत कायराने कॅप्शन दिलं आहे की, “अक्षय कुमारसोबत माझा नवीन चित्रपट येत आहे. ही माहिती देण्यासाठी मी खूप उत्साहित आहे”.

तुषार कपूर आणि शबीना खान या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा हाऊसफुल 4 चित्रपटाचे दिग्दर्शक फरहाद समजी यांनी लिहिली आहे. या चित्रपटात आर माधवन आणि शोभिता धुलिपालाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.