अक्षय कुमार सर्वात जास्त कमाई करणारा अभिनेता, एका वर्षाची कमाई तब्बल…

बॉलिवूडमध्ये अभिनेता अक्षय कुमारने एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंद केला आहे. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली आहे.

  • Updated On - 6:07 pm, Thu, 11 July 19 Edited By:
अक्षय कुमार सर्वात जास्त कमाई करणारा अभिनेता, एका वर्षाची कमाई तब्बल...

मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेता अक्षय कुमारने एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंद केला आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत अक्षयने पहिले स्थान मिळवले आहे. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली. या यादीत एकमेव भारतीय अभिनेता अक्षय कुमारच्या नावाचा सामावेश आहे. अक्षय कुमार फोर्ब्सच्या यादीत 35 व्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या स्थानावर गायक टेलर स्विफ्ट आहे.

फोर्ब्सने अभिनेता अक्षय कुमारला बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता असल्याचे सांगितले. 2018 जून ते 2019 या एक वर्षात अक्षय कुमारने 444 कोटी रुपयांची कमाई केली. या शानदार कमाईसोबत अक्षयने आंतरराष्ट्रीय स्टार रिहाना, जॅकी चेन, स्कारलेट जोहनसन आणि ब्रँडली कपूरलाही मागे टाकले आहे.

अक्षय सध्या आपल्या नवीन चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. यामध्ये मिशन मंगल, हाऊसफुल्ल 4, गुड न्युज, लक्ष्मी बॉम्ब आणि सूर्यवंशी या चित्रपटांचा समावेश आहे. मिशन मंगल 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

2019 मध्ये अक्षय कुमारचा केसरी चित्रपट प्रदर्शित झाला. केसरीने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. गेल्यावर्षी अक्षयने 2.0, पॅडमॅन, गोल्ड हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI